त्या शाळेवर आज होणार गुन्हा दाखल, मनाई असतानाही भरली शाळा!
उदगीर-
केंद्र व राज्य सरकारने शाळा सुरु करण्यास अद्यापही परवानगी दिलेली नाही. मात्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत उदगीरात एका शाळेत नियम तोडून विद्यार्थ्यांचे वर्ग भरवल्याची घटना उघडकीस आली आहे.
याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले होते, आज संबंधित शाळेवर गुन्हा दाखल होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे
उदगीर येथील नळेगाव रोडवर असलेल्या अक्षरनंदन मराठी शाळेत गेल्या चार दिवसापासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत
याबाबत शिक्षण विभाग व प्रशासन अनभिज्ञ होते. येथील काही माध्यम प्रतिनिधींनी याची माहिती समजल्यानंतर त्यांनी सोमवारी दि.२२ या शाळेवर जाऊन पाहणी केली असता विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू असल्याचेे निदर्शनास आले होते
पत्रकारांनी शाळेत वर्ग सुरु असल्याचे फोटो आणि व्हिडिओ फुटेज घेऊन ते प्रशासनास पाठवले होते संबंधित शाळेवर आता कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. दि.१५ जून पासून शाळा सुरू होणे अपेक्षित होते
परंतु कोरोना विषाणूूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्यामुळे शासनाने तूर्तास शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतलेला आहे
तरीही शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत येथील अक्षरनंदन शाळेत बिनदिक्कतपणे विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वसन त्यांनी दिले होते, आज मंगळवारी लातूर चे उपशिक्षणाधिकारी मोरे यांनी संबंधित शाळेची चौकशी केली व अहवाल लातूर येथील माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना देण्यास ते लातूर येथे गेले असून, प्रथम दर्शनी शाळा दोषी दिसत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार यानी आज सायंकाळ पर्यंत सम्बन्धित शाळे विरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे