शिवसेना उदगीर नगरपालिका स्वबळावर लढणार= मा. आमदार सुधाकर भालेराव 👉 नगरविकास खाते एकनाथ शिंदे कडे असल्याने शिवसेना उदगीर चा विकास भूतो न भविष्यती करू 👉 नगरपालिका हद्दीतील भ्रष्टाचार मिटवणार 👉 मुस्लिम समाजाला सोबत घेऊन विकास करू 👉 मागील काळातील विकास माझ्या कार्यकाळातील 👉 केलेल्या कामाची प्रसिद्धी न केल्याचे खंत 👉उदगीरकराच्या हितासाठी,सर्वांगीण विकासासाठी मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलो असून मी आता गप्प बसणार नाही 👉 उदगीर, अहमदपूर नगरपालिका निवडणूक शिवसेना स्वतंत्र लढवणार असून जनतेनी आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन सहकार्य करतील असे सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे
Popular posts
ठरलं भाजप राष्ट्रवादी ? नगराध्यक्ष भाजप, भाजप 18 राष्ट्रवादी 19 अन्य 3 फॉर्म्युला? उदगीर:- उदगीर नगरपालिका निवडणुकीत आता भाजप राष्ट्रवादी (अजित पवार) गट यांची युती संदर्भात फायनल बैठक झाल्याची चर्चा असून या निवडणुकीत नगराध्यक्ष पद भाजप ला तर त्या बद्दल राष्ट्रवादी ला एक नगरसेवक जास्त असल्याची चर्चा सूत्र करत आहेत तर राष्ट्रवादी ला प्रभाग 1,2,3,4,5,6,10,11,12 आणि 13 तर भाजप ला प्रभाग 7,8,9,14,15,16,17,19,20 मिळेल अशी चर्चा आहे,तर 18 मधून 2, 20 मधून 1 ही जागा अन्य देण्यात येईल अशी ही सूत्रांची माहिती असून हा अंदाज आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे , होऊ शकते उदगीर समाचार चा अंदाज खरा ठरतो किंवा खोटा हे लवकरच समजेल
उदगीर नगरपालिकेत सत्ता पालट ? 👉 अनेक माजी नगरसेवकाची नाराजी भोवणार ! उदगीर:- उदगीर नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असून आता नामांकन दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी चालू असून काही पक्ष हवेत आहेत की आम्ही जो उमेदवार दिला तो निवडून येईल हे त्यांचे भ्रम दिसत असून जश्या निवडणूक निरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या तश्या प्रभागात जाऊन तेथील मतदाराच्या ही प्रतिक्रिया घेतल्या असत्या तर चांगले झाले असते असे मतदार बोलत आहेत या वरून ज्या माजी नगरसेवका बद्दल रोष आहेत त्याचा फटका अनेक पक्षाला बसण्याची शक्यता दिसत आहे,शहरात होत असलेल्या गुप्त बैठकीचा सारांश घेतला तर ज्या पक्षाचा नगराध्यक्षाचा उमेदवार सक्षम असेल त्याचा झेंडा नगरपालिकेवर फडकेल असे दिसत असून पुढील दोन दिवसात हे स्पष्ट होईल
कृषी उत्पन्न बाजार समितीस सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर ,बाजार समितीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी - शिवाजीराव हुडे उदगीर = उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची होणारी सोयाबीन खरेदी विक्रीच्या संदर्भातली अडचण विचारात घेऊन, सोयाबीन खरेदी केंद्र आपल्याकडे मिळावे. अशी मागणी पणन महामंडळाकडे केली होती. लोक कल्याणकारी योजनेचा भाग म्हणून पणन महामंडळाकडून उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी दिली आहे. मंजुरीचे अधिकृत पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाले असून त्या पत्रानुसार सोयाबीन खरेदी केंद्र उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या सोयाबीनच्या नोंदी करून घ्याव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीला सक्रिय होऊन काम करता येईल
उदगीरच्या ॲड.महेश,बाळासाहेब डोईजोडे चा गाणगापूरच्या नदी संगमावर बुडून मृत्यू उदगीर : गाणगापूर येथील नदी संगमात स्नानासाठी गेलेल्या दोघा सख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू झाला तर डोईजोडे यांचा मुंबईचा मित्रही पाण्यात बुडाल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. उदगीर येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे राहत असलेले सिने दिग्दर्शक व भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. महेश डोईजोडे हे आपल्या मित्रांना सोबत घेवून कुटुंबियांसह मुंबईहून गाणगापूर येथे दर्शनासाठी गेले होते. महेशने त्याचा भाऊ बाळासाहेब डोईजोडे यालापण उदगीरहून कुटुंबियांसह गाणगापूरला येण्यासाठी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब डोईजोडे यांनीही आपले कुटुंब घेवून उदगीरहून गाणगापूरला पोहचले होते. डोईजोडे व पाटील कुटुंबातील सर्व सदस्य बुधवारी एका लॉजवर थांबले होते. गुरुवारी सकाळी अॅड. महेश डोईजोडे (४७) व त्यांचा भाऊ बाळासाहेब डोईजोडे (४९), मुंबईचा मित्र कैलास पाटील हे तिघेजण गाणगापूरच्या भीमा-अमरजा नदी संगमात स्नानासाठी गेले असता अॅड. महेश व बाळासाहेब या दोघा भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर कैलास पाटील यांच्या तोंडात व पोटात पाणी गेल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गाणगापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत बाळासाहेब डोईजोडे हे उदगीर येथील शेटकार इस्टेटमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राची सेवा करीत होते. गाणगापूर येथे अॅड. महेश व बाळासाहेब यांच्या प्रेताची उत्तरीय तपासणी करून दोघांचेही प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असुन दोघांही भावांवर शुक्रवारी सकाळी उदगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
Image