लातूर जिल्हा केमिस्ट संघटना ही ठेकेदारांची संघटना...... रामबिलास .आर नावंदर
उदगीर :- लातूर जिल्हा केमिस्ट संघटना ही फक्त ठेकेदाराची संघटना असून गेली 18 वर्ष लातूर येथील संघटनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी आपले घर कसे भरता येईल एवढेच पाहिले असून यांनी रिटेलर ला जिरवण्यासाठी
प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यां ची निंवड आपल्या मर्जी प्रमाणे करून सामान्य केमिस्ट चे आवाज बंद केले व आपली दुकाने रस्त्यात मांडून ठेवले असी घणाघाती टीका उदगीर येथील बैठकीत रामविलास नावंदर यांनी केले आहे. उदगीर येथील लक्ष्मीनारायण मंदिर येथील झालेल्या रिटेलर बैठकीत केमिस्ट संघटने वर घणाघाती हल्ला करत म्हणाले की संघटनेचे पदाधिकारी हे रिटेलर्स ला साफ करून आपले घर कसे भरता येईल हेच बघत आहेत ते डायरेक्ट कस्टमर ला देवून रिटेल केमिस्ट चा धंधा बंद करण्याचा घाट घातला आहे
, हे आपल्या मर्जी प्रमाणे डिस्काउंट देणे, मााल देताना घेवू वाटल तर घ्या नाही तर कुठे ही घ्या अशी अरेरावीची भाषा वापरणे, मुदत बाह्य औषधी परत घेण्यास टाळाटाळ करून मनमानी करत आहेत, रिटेल सदस्य नोदणी घेवून लातूर जिल्हा केमिस्ट संघटना चे भवन निर्माण केले पण सामन्या केमिस्ट आल्यास त्याला त्याचं फायदा कुठेच होत नाही येथील औषधी भवन एक शोभेची वस्तू करून ठेवली आहे
संघटनेचे हुकुमशाही काम पाहिल्यावर शितोळे अंतेश्र्वर यांनी राजीनामा दिला असून आता रिटेलर्स यांची संघटना प्रत्येक तालुक्यात व गावांत स्थापन करून यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही रामविलास नावंदर यांनी या वेळी सांगितले, या बैठकीस अनेक रिटेलर्स उपस्थित होते