नवरात्री गरबा दांडिया ला बंदी, मिरवणुका काढू नये, शासनाची नियमावली जाहीर
उदगीर :- नवरात्री निमित्त शासनाने नवीन आदेश काढले असून यात गरबा, दांडिया, मिरवणुका यास बंदी असून, रावण दहन ही प्रतीकात्मक स्वरुपात सादर करण्यात यावे असे म्हंटले आहे
कोरोंना महामारी पसरू नये म्हणून शासनाने नवरात्री साठी नवीन आदेश दिले असून यात गरबा, दांडिया वर पूर्ण बंदी घातली असून सार्वजनिक देवी मंडळानी प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असून मूर्ती 4 फूट पेक्षा जास्त उंच राहू नये, भजन व धार्मिक कार्यक्रम करण्या पेक्षा आरोग्य विषयक शिबिरे आयोजित करावे कुठलीही मिरवणूक काढण्यात येऊ नये , दसरा मेळावा आयोजित करू नये, रावण दहन ही प्रतीकात्मक स्वरुपात करावा व लोक जमू नयेत म्हणून त्याचे फेसबुक लाइव करावे, देवीच्या मंडपात 5 पेक्षा अधिक लोक राहू नयेत, देवीचे दर्शन ऑनलाइन द्यावे असा आदेश शासनाने दिला आहे, याचे तंतोतंत पालन करण्याचे ही आदेश शासनाकडून दिले आहेत