आम. बाबासाहेब पाटलाचा उदगीर महावितरण अधिकाऱ्याला झटका. :- अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांनी उदगीर येथील महावितरण च्या कार्यकारी अभियंता कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला व जाब विचारला*
उदगीर :-
अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांना मतदारसंघातील व महावितरण विभागातील शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी त्यांच्या अडचणी ची कैफियत सांगितली व अनेक तक्रारी दिल्या आमदार महोदयांनी उदगीर च्या कार्यालयात जाऊन पंचनामा केला व जाब विचारला. यामुळे वेळेवर ट्रांसफार्मर मिळत नाही, ट्रांसफार्मर देत असताना शेतकऱ्यांना चांगली वागणूक मिळत नाही, शेतकरी अनेक वेळा येऊन कार्यालयात चकरा मारतात, कार्यालयीन कर्मचारी चांगल्या पद्धतीने समजावून सांगत नाहीत, किंवा वागणूक चांगली देत नाहीत, तसेच ट्रांसफार्मर देत असताना भेदभावाची वागणूक करतात, अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांनी स्वतः उदगीरला येऊन महावितरणचे कार्यकारी कार्यालय असलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कार्यकारी अभियंता श्रवण कुमार व ट्रांसफार्मर वितरणचे अभियंता पोतदार यांना त्यांच्या कार्यालयातील रजिस्टर व वितरण करण्याची पद्धत व शेतकऱ्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारी यांचा ताळमेळ लावून रितसर रजिस्टर प्रमाणे तपासणी करून त्यांना खडे बोल सुनावले. तसेच अहमदपूर व चाकूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवून घेतले. व इथून पुढे शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल नाही घेतल्यास व शेतकऱ्यांना अडचणी निर्माण केल्यास, गावकऱ्यांना त्रासदायक वागणूक दिल्यास, तसेच वेळेवर ट्रांसफार्मर नाही दिल्यास, रीतसर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करू अशी तंबी दिली व रजिस्टर मध्ये असलेल्या चुका यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत असे सांगितले. व ट्रान्सफर्मार देते वेळेस जाणून बुजून काही लोकांना टाळणे निदर्शनास आल्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महावितरणचे कार्यकारी अभियंता श्रावण कुमार यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांना यापुढे अशी चूक होणार नाही व यापुढे शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना रीतसर सिरीयल नंबर प्रमाणे व जेथे आवश्यकता असल्यास अर्जंट ट्रांसफार्मर उपलब्ध करून देऊ व जनतेची गैरसोय होऊ देणार नाही असे आश्वासन दिले. व विनंती केली आणि ट्रांसफार्मर वितरण विभागाच्या पोतदार या अभियंत्यास यापुढे चांगले वागण्याची तंबी आमदार महोदयांच्या समोरच दिली.सोबत शेलगाव येथील शेतकरी गणेश पाटील स्वीय सहाय्यक धनंजय जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.