हंचनाळ ग्रा. प. भ्रष्टाचार तपास समिति मार्फत करा :- उपोषण कर्ते भगवानराव बिरादार
:- हा काही छोटा भ्रष्टाचार नाही, आमचे डोळे पुसण्या इतके आम्ही वेडे नाहीत, अन्यथा लवकरच आयुक्तां कडे दादा, न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार :- उपोषण कर्ते
उदगीर :- हंचनाळ ता. देवनी येथील ग्रा. प. मध्ये लाखो चा भ्रष्टाचार झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून ही ग्रामसेवक याना गटविकास अधिकारी पाठीशी घालत असल्याने आम्ही जी. प. समोर उपोषण केले तेंव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यवाही चे आश्वासन दिले पण सदरील तपास हा समिती स्थापन करून करण्यात यावा अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील असे उपोषण कर्ते भगवान बिरादार व मधुकर बिरादार यांनी उदगीर समाचार ला बोलताना सांगितले आहे
हंचनाळ ग्रा. प. मधील लाखोंचा भ्रष्टाचार उघड दिसत असताना देवनी चे गटविकास अधिकारी राऊत यांनी तत्कालीन ग्रामसेवक कैलवाडे यास पाठीशी घातले, आज नवीन ग्रामसेवक पाणी प्लांट चे 8 दिवसास 2000 ते 2500 रू. जमा करतात मागील हिशोबच गायब आहे, ग्रामपंचायत मधील रेकॉर्ड भ्रष्टाचार करणार्यानी गायब केले, बिल एकाचे व पैसे दुसर्या ने चेक ने उचलून घेतले हे कितपत योग्य आहे या बाबत मागील दोन वर्षांपासून आम्ही माहिती अधिकारात माहिती मागितली अपील केले असता गटविकास अधिकारी यांनी माहिती अधिकार पत्रास कचरा कुंडी दाखवली, या भ्रष्टाचारात ग्रामसेवक व गटविकास अधिकारी सहभागी आहेत म्हणुन यांची चौकशी व यांच्या मालमत्ते ची चौकशी करून कारवाई करण्यात यावी म्हणुन आम्ही 23 नोव्हेंबर रोजी जी. प. लातूर समोर उपोषण केले येथील मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी चौकशी करू असे आश्वासन दिले पण येथे आम्हास न्याय मिळणार नाही म्हणुन आम्ही आमचे आंदोलन हे मा. आयुक्त औरंगाबाद यांच्या कार्यालया समोर करणार आसे पत्र देऊन येथील उपोषण थांबले, पण येथील भ्रष्टाचाराचे पाळे मुळे खोलवर असल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी कोणास तरी चोकसी देण्याचा प्रयत्न केला जात असून हे आम्ही सहन करणार नाही, येथील चौकशी ही जिल्ह्यातील नामवंत यांची समिती स्थापन करून करण्यात यावी अन्यथा आम्हाला आयुक्तां समोर उपोषण करावे लागेल व येथे ही आमचे कोणी ऐकत नसेल तर आम्ही मा. उच्च न्यायालयात लवकरच जनहित याचिका दाखल करून याना धडा शिकवू असे उपोषण कर्ते भगवान बिरादार व मधुकर बिरादार यांनी उदगीर समाचार ला बोलताना सांगितले आहे