उदगीरात शिवजयंती मोठया उत्सहात, थाटात साजरी होणार= अजित पाटील तोंडचिरकर उदगीर= उदगीरात शिवजयंती मोठया थाटात, साजरी करणार असल्याचे सार्वजनिक जयंती समिति चे अधक्ष अजित पाटील तोंडचीरकर यानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले उदगीरात शिवजयंती निमित्त 13 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत शिवजयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचे उद्घाटन सोमवार ता.13 रोजी सकाळी 8 वाजता विद्यावर्धीनी शाळेत होणार आहे,या वेळेस डॉ मस्के सर यांचे छ. शिवरायाचे प्रशासन या विषयावर व्याख्यान होणार आहे,14 तारीख मंगळवारी शिव व्याख्याते प्रदीप ढगे यांचे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर सकाळीं 8 वाजता विध्यावर्धनी येथे व्याख्यान तर सायंकाळी शिवशाहीर संतोष साळुंके यांचा नप प्रांगणात पोवाडा कार्यक्रम होणारं आहे,15 बुधवारी रयतेचे राजे छ. शिवाजी महाराज या विषयावर सिध्देश्वर लांडगे यांचे व्याख्यान विध्यावर्धिनी वर ,16 गुरुवार रोजी 5 वी ते 7 वी,8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्या साठी भाषण स्पर्धा,17 शुक्रवारी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या विषयावर बाल शिव व्याख्याती कु. आकांक्षा विश्वनाथे चे व्याख्यानं सकाळीं 8 वाजता ,11.30 वाजातर 4 थी ते 9 वी च्या विद्यार्थ्या साठी टॅलेंट सर्च परीक्षा,18 शनिवार रोजी सकाळीं 8 ते सायंकाळी 6 पर्यन्त वृक्षारोपण,मशाल रॅली,19 फेब्रुवारी रविवारी रोजी सकाळीं 7.30 वाहतात बाळ शिवबा पाळणे, उदगीर शहरातून भव्य मिरवणूक निघणार असून या मिरवणुकीत सामील पथकास प्रथम 11001, द्वितीय 7001, तृतीय 5001बक्षीस देन्यात येणार आहे , या वर्षाची शिवजयंती ही भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्यात येणार असून या सर्व कार्यक्रमात, मिरवणुकीत सर्वानी शमील व्हावे असे आवाहन ही अजित पाटील तोंडचीरकर यानी केलें असून या वेळेस प्रास्ताविक प्रा. गोपालकृष्ण घोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनाथ गायकवाड यांनी मानले,या वेळेस संतोष बिरादार, निवृत्ती सुकाने सह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
