जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत उदयगिरी बॅडमिंटन अकॅडमीचे नेत्रदीपक यश उदगीर : लातूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने स्वर्गीय राजगोपाल भार्गव यांच्या स्मृतिप्रित्यार्थ आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा दिनांक 14, 15 व 16 जुलै 2023 रोजी लातूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत उदयगिरी बॅडमिंटन अकॅडमी उदगीरच्या खेळाडुनी यशस्वी कामगिरी केली आहे. एकेरी बॅडमिंटन क्रीडा प्रकारात - 13 व 14 वर्षाखालील मुलींच्या गटात अविका मुंदडा- प्रथम, 13 वर्षाखालील मुलांच्या गटात मोहम्मद सैफान- प्रथम, 11 वर्षाखालील मुलांच्या गटात नोमान मंगरुळे - प्रथम क्रमांक पटकावला आहे तर 17 व 19 वर्षाखालील मुलींच्या गटात नुपूर मलवाडे- द्वितीय क्रमांक पटकावला आहे. बॅडमिंटन दुहेरी क्रीडा प्रकारात 17 वर्षाखालील मुलींच्या गटात नुपूर मलवाडे व अविका मुंदडा- प्रथम, 13 वर्षाखालील मुलांच्या गटात मोहम्मद सैफान व नोमान मंगरुळे- प्रथम क्रमांक पटकावले आहे. तसेच 13 वर्षाखालील मुलांच्या गटात सर्वेश पाटील व स्वराज नकाशे द्वितीय,15 वर्षाखालील मुलांच्या गटात स्वराज नकाशे व मोहम्मद सलमान- द्वितीय, 17 वर्षाखालील मुलांच्या गटात शैजान हाश्मी व मोहम्मद सलमान- द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या सर्व खेळाडूंना बेंगलोर येथील ओवेस कमाल, जोहेब हाश्मी व क्रीडा संचालक प्रा. सतीश मुंढे यांनी बॅडमिंटन प्रशिक्षण दिले. या सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल खेळाडूंचे पालक डॉ. प्रवीण मुंदडा, अजमत खान, नकाशे, विश्वनाथ पाटील, प्रा. रामदास मलवाडे, सरदार मंगरुळे, भरत चामले यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वतीने उदगीरमध्ये पहिली बॅडमिंटन अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. या बॅडमिंटन अकॅडमीसाठी उदगीरकरांचा चांगला प्रतिसाद आहे. दररोज सकाळ व सायंकाळ सत्रामध्ये 150 पेक्षा जास्त लहान मुले व वयस्कर व्यक्ती सराव करत आहेत. उदगीर परिसरातील बॅडमिंटन खेळाडूंना दर्जेदार इंनडोअर स्टेडियम उपलब्ध करून देऊन जिल्हा, राज्य व राष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय कटिबद्ध आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी यांनी व्यक्त केले. उपाध्यक्ष डॉ. रेखा रमण रेड्डी, उपाध्यक्ष ऍड. प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव ऍड.एस.टी.पाटील, सहसचिव डॉ.आर.एन.लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. जी. पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
