अल्पवयीन मुलीस,जबरदस्तीने तुझ्यावर प्रेम आहे,लग्न कर म्हणून विनयभंग, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. उदगीर:- उदगीर शहर पोलिस स्टेशन येथून मिळालेली माहिती अशी की येथील 17 वर्ष 5 महिन्यांच्या मुलीस आरोपी असिफ अल्लाउद्दीन शेख रा.तोंडार ता.उदगीर याने फिर्यादी यांची मुलगी हीचा सतत इंस्टाग्राम वर पाठलाग करुन तिच्याशी जवळीक साधुन दि 14/08/23 सकाळी वेळ 09.00वा च्या सुमारास तिस शिवाजी काॅलेज येथुन सोबत राजराजेश्वरी मंदीर बाजूस घेउन जाउन फिर्यादीची मूलगी हीचा वाईट हेतूने हात धरून म्हणाला की,तूझ्यावर माझं प्रेम आहे.तू माझ्या सोबत लंग्न कर असे म्हणून तिचा विनयभंग केला आहे. फिर्यादी च्या तक्रारी, जवाबा वरून मा पो नि सो यांचे आदेशाने शहर पोलिस स्टेशन येथे दि 15/08/2023 रोजी गुरनं 258/23 कलम 354, 354 (ड) भादवि 8,12 पोक्सो (बाल लैगीक अत्याचार अधिनियम) ने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मपोउपनि जाधव हे करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी