जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर झालेली विशेष सहायक सरकारी अभियोक्ताची निवड प्रक्रीया वादाच्या भोवर्‍यात, जाहिरातीत नमूद नसलेल्या कागद पत्रा आधारे अनेक उमेदवार केले अपात्र, अपात्र उमेदवाराची दाद न फिर्याद! 👉 23 तारीख बुधवारी घोषीत होणारी छाननी यादी 24 तारखेला अंतिम होऊन देखील शुक्रवारी 25 ला कार्यालयीन वेळ संपल्यावर घोषित, पुढे शनिवार, रविवार सुट्टी लगेचच सोमवारी सकाळी पात्र उमेदवाराची मुलाखत, गौडबंगाल काय? 👉 जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत जाहीर प्रगटन, सरकारी अभियोक्ता ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवड होणारं ते संकाये मॅडम म्हणतात तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे करा, जिल्हाधिकारी म्हणतात तो विभाग आमचा नाहीं,मग तक्रार करायची कोठे जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांची भूमिका वेगळी कशी, तक्रार दाराची तक्रार घेऊन त्या विभागास पाठवणे क्रमप्राप्त असताना यानी केले हाथ का वर ? 👉 अटी मधे उमेदवार भारतीय नागरीक असावा पण कोठेच त्याचा पुरावा द्या हा उल्लेख नसताना अनेक उमेदवार अपात्र 👉यातील काही उमेदवार हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सरकारी अभियोक्ता या पदासाठी वयाच्या अटीनुसार मागासवर्गातून पात्र असतानाही उमेदवारांना खुला प्रवर्गात दाखवून त्यांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे तर काहींना कास्ट प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देऊन देखील राष्ट्रीयत्व नसल्याबाबत दाखवून अपात्र ठरविण्यात आलेले आहे याबाबत जाहिरात मध्ये कुठेही राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र दाखल करण्याचे नमूद केलेले नव्हते 👉 अपात्र घोषित उमेदवाराचे म्हणणे कोण ऐकावे, दाद कोणाकडे मागावे,पण जांच्या कडे अपेक्षा त्यांनीच याना सोडले वाऱ्यावर ? उदगीर:- लातूर जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत दि.14/08/2023 रोजी जाहीर प्रगटना द्वारे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता 5, प्रतीक्षा यादी वर 5 असे एकूण 10 सरकारी अभियोक्ता साठी अर्ज मागविण्यात आले त्यात पहिली अट होती की उमेदवार भारतीय नागरीक असावा (पुरावा द्यावे असे कुठेच नमूद केलेले नाही), या सह अनेक मुद्दे होते,खुल्या प्रवर्गासाठी वयाची अट 38 वर्ष तर राखीव साठी 43 वर्ष अशी होती,व अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे,जन्म तारखेचे प्रमाणपत्र,जात प्रमाणपत्र,बार कौन्सिलचे प्रमाणपत्र व अनुभव प्रमाणपत्र देण्यास सांगितले होते त्यानुसार 62 विधीतज्ञांनी अर्ज दाखल केले यांची छाननी यादी 23/8/23 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार होती सदर यादी 24/08/2023 रोजी अंतिम यादी तयार होऊन देखील ती शुक्रवार 25/08/23 रोजी कार्यालयीन वेळ संपल्यावर जाहीर करण्यात आली झाली. त्यात अनेक उमेदवारास जाहिरातीत नमूद नसलेल्या कागद पत्रा आधारे 49 उमेदवारास अपात्र घोषित करण्यात आले अणि फक्त 13 उमेदवार पात्र दाखऊन लगेच त्याची सोमवारी सकाळीं 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखत ठेवण्यात आली, यादी प्रसिद्धी नंतर उमेदवारांना कैफियत दाखल करण्यासाठी अथवा कागदपत्रे दाखल करण्यासाठी कुठलीही संधी देण्यात आली नाही. शनिवार रविवार आल्याने अपात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी यांच्या समोर कैफियत मांडली पण जिल्हाधिकारी यानी पाच मिनिटांनी बोलावते म्हणून पात्र ठरविण्यात आलेल्या 13 उमेदवारांचे मुलाखत घेऊन ते महीला आयोगाच्या अध्यक्षाच्या कार्यक्रमास गेल्या. कैफियत घेतलेल्या उमेदवारांना कार्यालयात अनेक तास थांबऊन ठेवले पण जिल्हाधिकारी मॅडम काही कार्यालयात आल्याचं नाहीत, उमेदवारांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्याकडे आमची तक्रार घ्या म्हणून अनेक वेळेस विनंती केली की पण त्यांनी ही अधिकाऱ्याचा रुबाब दाखवत त्यांना खेळवत ठेवले यात पात्र उमेदवाराची मुलाखत ही झाली पण या अपात्र घोषित उमेदवाराची तक्रार ऐकण्यास ना जिल्हाधिकारी याना किँवा संबंधित सरकारी अभियोक्ता याना वेळ नसल्याने शेवटी कंटाळून या अपात्र उमेदवारानी अवक जावक विभागांत तक्रार द्यावे असे ठरले आवक जावाक विभागाने ही अधिकाऱ्याच्या शेरे शिवाय तक्रार घेणार नाही म्हणत त्यांची हेळसांड चालु केली, शेरा देण्यास न जिल्हाधिकारी उपलब्ध, नाहीं निवासी उपजिल्हाधिकारी शेरा देण्यास तयार, कार्यालय बंद करण्याच्या वेळेस शेवटी तक्रार घेतली ती बगर शेरे शिवाय तेही आवक जावक् विभागाने, 9 अपात्र उमेदवारानी आपल्या तक्रारीत म्हणाले की जाहीर प्रगटणात नमूद नसलेले कागद पत्रा आधारे आम्हास अपात्र घोषित केले असून भरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी केली असून या निवेदनावर ॲड.वैभव धुमाळ, ॲड.मनिष्या कलमे, ॲड.संतोष म्हेत्रे, ॲड.सविता राठोड, ॲड.सचीन माने, ॲड.अतुल डोंगरे, ॲड.गोविंदा सोनी, ॲड.एम देशमुख यांच्या सह्या असून , येथे जर यांची फिर्याद ऐकली नाहीं तर आम्हास संबंधित मा.न्यायालयात जाऊन दाद मागावी लागेल असे ही त्यांनी सांगितले आहे, आता या अपात्र उमेदवारास न्याय कोण देईल हे पाहावे लागेल
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image