मारवाडी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या लातूर येथील परिवहन निरिक्षक बजरंग कोरावले वर त्वरित कार्यवाही करुन निलंबित करा:- लातूर जिल्हा, उदगीर तालुका माहेश्वरी सभा उदगीर: लातुर येथिल आरटीओ बजरंग कोरावळे यानी समाज माध्यमावर मारवाडी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करून मारवाडी समाजाच्या भावना दुखविल्या असून अश्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आरटीओ बजरंग कोरावले वर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी, त्यांना त्वरीत निलंबित करण्यात यावे अशी मागणी एक्या निवेदनाद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी,परिवहन मंत्री तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह अन्य ठिकाणी लातूर जिल्हा माहेश्वरी सभे चे अध्यक्ष प्रकाश कासट,सचिव फुलचंद काबरा, उदगीर तालुका माहेश्वरी सभा अध्यक्ष श्रीनिवास सोनी,सचिव राजगोपाल मनियार यानी केली असुन उदया बुधवार 4/10/2023 रोजी लातुर येथिल लाहोटी कंपाउंड येथुन सर्व समाज बांधव लातुर येथिल उपविभागीय परिवहन कार्यालय येथे जाऊन या घटनेचा निषेध करुन संबंधित माजोरी परिवहन निरीक्षकावर कार्यवाही करण्याची मागनी ही करनार आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
