मतदार नाव नोंदणी करायची ? 09.04.2024 पर्यन्त शेवटची संधी :- निवडणूक अधिकारी सुशांत शिंदे उदगीर :- उदगीर चे उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सुशांत शिंदे यांनी उदगीरच्या नवमतदारांना व आगामी लोकसभेत मतदान करू इच्छिणाऱ्या मतदारांना आवाहन केले आहे की दिनांक 09.04.2024 पर्यंत मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आयोगाने शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे,मतदारांनी ही संधी सोडू नये , आगामी लोकसभा 2024 च्या निवडणूकीची पुरवणी यादी समाविष्ठ करुन अंतीम मतदार यादीत प्रसिध्द होईल व त्यां सर्व मतदारांना मतदान करण्याची संधी आगामी लोकसभेत निवडुकीमध्ये मतदान करण्याचे हक्क बजावण्याची संधी त्यांना राहील. त्या नंतरच्या मतदारांना मतदार यादी नाव समाविष्ठ नसलेल्या मतदारांना मतदान नोंदणी करण्याची संधी बंद होत असल्यामुळे मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध नसणार आहे. त्या मूळे दिनांक 09.04.2024 पर्यंत मतदार यादी नाव नसलेल्यानी मतदार यादीत 9 एप्रिल पर्यंत आयोगाने दिलेल्या विविध voter helpline app ., NVSP , महा ई सेवा केंद्र वह अन्य इतर माध्यमातून नाव समाविष्ठ करुन घ्यावे. या करीता जास्तीत जास्त मतदारांनी नाव नोंदणी करावी. व या संधीचा लाभ घेवून मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे व आगामी लोकसभा 2024 निवडणूकीत मतदान करुन लोकशाही बळकट करावी व मतदानाचा हक्क बजवावे असे आवाहन त्यांनी केलें आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
