सावधान या लुटारू पासून 👉 व्यापाऱ्यांना गंडा घालण्यात शातिर आहेत आरोपी 👉 इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, किराणा अन्य दुकानदाराना घालतात लाखोंचा गंडा, होतात फरार 👉 फेब्रुवारी 2024 मध्ये पाथर्डी पोलिस स्टेशन मध्ये यांच्या विरुद्ध गु र.159/2024 ने 420 चां गून्हा दाखल करण्यात आला व्यापार्यांनी या लुटारूंना धरून पोलीसांना दिले यानी रोख रक्कम भरून जमानत घेऊन त्यांनी पुढे उदगीर मधील व्यापाऱ्यांना लुटले 👉 आधारकार्ड विनोद नेमीचंद शर्मा दीनदयाळपुर वाराणशी , वोटर आइडी गणेश झगनलाल शर्मा लिंगंमपल्ली हैद्राबाद या नावाने असून त्यांचा मोबाईल नंबर 8941082016,9371459105 असून तो सद्या बंद आहे उदगीर= आम्ही होलसेल माल पुरवठा करणारे आहोत म्हणून तालुक्याच्या ठिकाणी एक छोटे ऑफिस उघडून बँकेत खाते काढून चेक बुक घेणे गावातील कोण इलेक्ट्रिकल , इलेक्ट्रॉनिक्स होलसेल व्यापारी आहे हे हेरून त्यांचें मन संपादन करून त्याना आम्ही फार मोठे विक्रते आहोत असे भासवायचे त्यांचेकडून एसी, कूलर, फ्रीज, वॉशिंग मशिन, एल ई डि टीव्ही, ब्रँडेड फॅन, वायर बंडल सह जो माल बाजारात सहज विकू शकतो असा शुक्रवारी घ्यायचा शनिवार बँक बंद आहे हे पाहून चेक द्यायचा , सदरिल माल गाडीत भरून गावच्या बाहेर घेऊन जायचे तेथें सदरील माल उतरून अन्य वाहनात भरून पोबारा करायचा व्यापारी शनिवार, रविवार बँक बंद असल्याने सोमवारी बँकेत चेक लावायचा बँकेत रक्कम नसल्याने चेक परत आल्याने व्यापाऱ्यांनी त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केले असता फोन बंद , आता आपली फसवणूक झाली हे लक्ष्यात येताच व्यापाऱ्याचे धाबे दणानुन जायचे, चेक् ची तक्रार करायची तर कुठे म्हणून व्यापाऱ्यांनी फसवणूक झाली म्हणून गप्प बसायचे आणि हे लुटारू परत एक्या तालुक्याच्या ठिकाणी पुन्हा लुटण्यासाठी सज्ज व्हायचे असा प्रकार चालू असून यानी पाथर्डी येथील व्यापाऱ्यांना गंडा घातला तेथील व्यापाऱ्यांनी याना धरून पोलिसस्टेशन ला दिले खरे पण या चतुर लुटारूंनी जमानत साठी नगदी पैसे भरून सुटले व्यापारी हाथ मळत बसले,असाच प्रकार यानी सोलापूर, परतूर, उदगीर येथे केला असून जर हे लुटारू आपणास कोठे दिसले तर कमल बाहेती याना 9860016357 वर त्वरीत कळवावे असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले असून हे लुटारू महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणी गंडा घालतात यांच्या पासून व्यापाऱ्यांनी सावध रहावे असे ही आवाहन उदगीर येथील व्यापाऱ्यांनी केले आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image