उदगीर शहर पोलीस ठाण्यात राजस्थानी मल्टी स्टेट च्या 12 संचालकांसह इतर 8 विरुद्ध 12 कोटी चा फसवणुकीचा गुन्हा दाखल 👉.गु.र.नं. - 148/2024 कलम 420,406,409,120 (ब), 34 IPC, 3 एम पी आय डी ॲक्ट. उदगीर= उदगीर शहर पोलिस ठाण्यात -धनराज विरशेट्टी बिरादार वय 63 वर्ष व्यवसाय सेवानिवृत्त कर्मचारी रा. विद्या विहार कॉलनी शेल्लाळ रोड उदगीर ता. उदगीर यांच्या तक्रारी वरून राजस्थानी मल्टी स्टेट बँकेचे अध्यक्ष चंदूलालजी बियाणी,उपाध्यक्ष बालचंद लोढा ,सचिव बद्रीनारायण बाहेती, सह सचिव प्रल्हाद अगरवाल , कोष्याध्यक्ष विजय लड्डा, संचालक अशोक जाजू, सतिष सारडा, ,अजय पुजारी , नामदेव रोडे , संचालिका प्रेमलता बाहेती , कार्यकारी संचालक जगदीश बियाणी , मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुलकर्णी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी पुरुषोत्तम कुलकर्णी ,सर्वावस्थापिका सौ. अर्चना मुंदडा, संचालिका कल्पना बियाणी, मुदत ठेव अधिकारी विद्याधर वैद्य सर्व रा. परळी वैजनाथ जि. बीड , शाखा व्यवस्थापक हेमंत भास्कर जकाते, रा. संभाजी नगर, व्यवस्थापक राधेश्याम झंवर कॉर्पोरेट ऑफीस रा. संभाजी नगर , मनोज चव्हाण वरिष्ठ शाखा व्यवस्थापक , संगणक प्रमुख अनंत भाग्यवंत यानी दि.19/11/2022 ते आज पावेतो दि.03/06/24 राजस्थानी मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. परळी वैजनाथ, शाखा लासुने कॉम्पलेक्स देगलुर रोड उदगीर येथील शाखेत फिर्यादीचे 11,31,765/- रुपये व त्यांचे ओळखीच्या लोकांचे 2,26,20,000/- रुपये असे एकुण 2,37,51,765/- रुपये व उदगीर शहरातील आणि परिसरातील ईतर 945 माहीती असलेल्या लोकांचे असे मिळुन जवळपास 12 कोटी रुपये जमा ठेऊन घेऊन विश्वासघात करुन फसवणुक केली असून गुन्हयाची पध्दत - सोसायटी मध्ये रक्कम गुंतवणुक करायला लावुन रक्कम परत न देवुन फसवणुक केली असून राजस्थानी मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि. व तिचे उपरोक्त संचालक मंडळातील आरोपीतांनी संगनमत करुन फिर्यादी व त्यांचे ओळखीच्या व माहितीतील लोकांनी गुंतवलेली रक्कम परत मागीतली असता मुळ रक्कम परत न करता व त्यावरील व्याजही न देता सदर सोसायटीचे फिर्यादीचे 11,31,765/- रुपये तसेच त्यांचे ओळखीच्या वरील लोकांचे 2,26,20,000/- 000/- रुपये आणि उदगीर परिसरातील फिर्यादीचे माहितीतील ईतर 945 लोकांचे असे मिळुन जवळपास 12 कोटी ऐवढी रक्कम पुर्व नियोजीत कट करुन कपटपुर्वक परत न करता ती स्वत्ःचे आर्थीक फायदया करीता वापरुन अन्यायाने विश्वासघात करुन फसणुक केली असल्याचा तक्रारी वरून पो नि सो यांचे आदेशाने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउपनि काळे हे करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
