उदगीरात फटाखे फोंडनारे साइलेंसर वाढले 👉 मागील पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी अश्या cylencer वर फिरवला होता रोड रोलर उदगीर= उदगीर शहरात बुलेट सह तत्सम मोटारसायकल चालकांनी फटाके फोडणारे सायलेन्सर बसवल्याने लहान मुले,मुली, महिलावर्गात घबराटीचे वातावरण दिसत आहे उदगीर शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी फटाके फोडणाऱ्या मोटारसायकल विरुद्ध योजना चालवली होती,फटाके फोडणारे सायलेन्सर चे वाहन दिसताच ते वाहन पोलिस ठाण्यात आणून त्याचे सायलेन्सर काढून जप्त करून त्या सायलेन्सर वर रोड रोलर फिरवत असल्याने फटाके फोडणाऱ्या वाहनाची संख्या कमी झाली होती पण त्यांची बदली होताच परत शहरात फटाके फोडणाऱ्या मोटारसायकची चलती असून हे मोटारसायकल स्वार महीला,मुली दिसल्या की त्यांच्या जवळ वाहन नेहून फटाके फोडत असल्याने महीला मुली सह छोटे मुळे घाबरून जात आहेत,पोलिस अधिकार्याणी त्वरीत अश्या मोटारसायकल स्वारावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी सामान्य जनता,महीला वर्गातून होत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी