८ फेब्रुवारी रोजी उदगीरात लोकसंस्कृती साहित्य संमेलन. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व रंगकर्मी प्रतिष्ठानचा पुढाकार. उदगीर : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई व रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान, उदगीर यांच्या वतीने उदगीरात दि. ८ फेब्रुवारी २०२५ शनिवार रोजी उदगीरात लोकसंस्कृती साहित्य संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषद, छ. संभाजीनगर चे उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके व रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी माहिती दिली. उदगीर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी महाविद्यालय परिसरात एक दिवशीय लोकसंस्कृती साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनात सकाळी ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, कविसंमेलन, कथा-कथन, परिसंवाद, पुरस्कार वितरण व सायंकाळी महाराष्ट्राची लोककला या संस्कृतिक कार्यक्रमाची रसिक श्रोत्यांना मेजवानी मिळणार आहे. या लोकसंस्कृती साहित्य समेंलनात महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक, कवी, कथाकार व चित्रपट क्षेत्रातील कलावंत उपस्थित राहणार आहेत. तेंव्हा या संमेलनाचा आनंद घेण्यासाठी उदगीर परिसरातील साहित्यिक, कलावंत व रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळ व रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने प्रा. बिभीषण मद्देवाड, मसाप चे केंद्रीय उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, सचिव प्रा. ज्योती मद्देवाड, दादाराव दाडगे ,अॅड महेश मळगे, रसुल पठाण, रविंद्र हासरगुंडे, रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे, मारोती भोसले, महादेव खळूरे, सिद्घार्थ सुर्यवंशी, सचिन शिवशेट्टे, प्रल्हाद येवरीकर, जहाँगीर पटेल, निता मोरे, ज्ञानेश्वर बडगे, विवेक होळसंबरे, सुनिल हावा , श्रीनिवास सोनी,अर्जुन जाधव , विक्रम हालकीकर ,टी. डी. पांचाळ, बालाजी भोसले, अर्चना पाटील, हणमंत केंद्रे, नागनाथ गुट्टे आदीनी केले आहे.
Popular posts
उदगीर नगर पालिका अधिकाऱ्याचा उंटावर बसून शेळ्या राखण्याचा प्रकार ? 👉 गेलेले मुख्याधिकारीच चांगले म्हणण्याची नौबत उदगीरकरावर 👉 मुख्याधिकाऱ्यांना भेटणे म्हणजे नशिबच,जेव्हा जावा तेव्हा साहेब बाहेर ,फोन ही घेत नाहीत 👉 आवक जावक विभाग प्रमुख तर स्वतःला राजा महाराजा समजतो? उदगीर:- स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने मागील अनेक वर्षांपासून उदगीर नगर पालिकेवर अधिकारी राज्य असून या अधिकाऱ्यांना शासनाने जनतेचे सेवक म्हणून ठेवले असताना हे अधिकारी उन्मत्त होऊन स्वतःला राजा महाराजा सारखे वागत असल्याचे चित्र सध्या उदगीर नगरपालिकेत पहावयास येत असल्याने सामान्य जनता त्रस्त दिसत आहे,मदमस्त कर्मचाऱ्याची तक्रार मुख्याधिकारी यांच्या कडे करावे म्हटले तर मुख्याधिकारी कोठे राहतात हे त्यांनाच माहिती,जेव्हा केंव्हा जावा मुख्याधिकारी कार्यालयात भेटत नाहीत, जाणाऱ्यांना गेलेलाच अधिकारी चांगला होता म्हणण्याची वेळ आली असून ,येथील आवक जावक ला जो कर्मचारी ठेवला आहे तो इतका उर्मट बोलतो की तो राजा महाराजा लाही मागे टाकत असून प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन जनतेच्या हितासाठी त्वरित अधिकारी बदलावेत अशी मागणी जनता करत आहे
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या . हंचनाळ ता. देवणी बिनविरोध ! 👉संचालक मंडळ सन 2025 ते 2030 पर्यंतच्या कालावधी साठी असेल उदगीर:- हंचनाळ ता. देवणी जिल्हा लातूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या 12 संचालकांची बिनविरोध निवड झाली असून या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे नूतन संचालक म्हणून सोनी श्रीनिवास मदनलाल, बिरादार संतोष बाबूराव, बिरादार शितल शिवाजीराव, बिरादार राजकुमार केशवराव, बिरादार पांडुरंग मारोतीराव ,बिरादार बालाजी माधवराव,कोनाळे शिवाजी वामनराव,पाटील लक्ष्मण धोंडीबा महिला संचालक म्हणून बिरादार राजाबाई तानाजीराव,बिरादार सुरेखा निळकंठराव,अनुसूचित जाती,जमाती महिला संचालक सुर्यवंशी जानकाबाई सुधाकर तर भटक्या विमुक्त जाती,जमाती महिला संचालक म्हणून सोनाळे मनिषा बाबुराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे,ही निवड निवडणुक निर्णय अधिकारी व्हि. डी. कदिरे यांनी यादी प्रसिद्ध करून आज 5/8/2025 रोजी केली आहे ,सर्व नूतन संचालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे, बिनविरोध निवडीसाठी गोपाळराव बिरादार, मधुकर बिरादार, कालिदास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले
Image
*अवैध सावकारीबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन* उदगीर : जिल्ह्यातील अवैध सावकरीविरुद्ध प्राप्त तक्रारींवर सावकारांचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत कार्यवाही केली जात आहे. वर्षभरात जिल्ह्यातील तालुकास्तरीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे ५५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबत तातडीने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. अवैध सावकारीविरुद्ध कोणत्याही नागरिकाची तक्रार असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरावर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे किंवा जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर या कार्यालयाकडे तक्रार सादर करावी. तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था एस.व्ही. बदनाळे यांनी कळविले आहे
उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे:- श्री बस्वराज पाटील नागराळकर अध्यक्ष महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी उदगीर उदगीर:- उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे असून आज ज्या काही संस्था कार्यरत आहेत त्या व्यापाऱ्याच्या सहयोगामुळे असून उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असल्याचे महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर यांनी अडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन वतीने आयोजित महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उत्तर देताना म्हणाले अडत वेलफेअर असोसिएशन वतीने आज रोजी अडत मार्केट मध्ये महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता,यात सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर,उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे,सचिव डॉ रामप्रसाद लखोटिया,सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवाजीराव हुडे,अजय दंडवते,आडेप्पा अंजुरे,शिवराज वल्लापुरे ,भाग्यश्री चाकुरकर,बस्वराज पाटील,नाथराव बंडे ,प्रशांत पेन्सलवार,अरविंद पाटील, दिलीप चौधरी,रमाकांत अंकुलगे,भिमाशंकर मुद्दा,मल्लिकार्जुन मानकरी, रामचंद तिरूके,डॉ. श्रीकांत मध्वरे , मन्मथ बिरादार यांचा सत्कार आयोजित केला होता,या वेळेस सत्काराला उत्तर देताना श्री बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले की महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी ही संस्था व्यापाऱ्यांनी,शेतकारयानी आपल्या कस्टाटुन उभी केली असुन,उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असून व्यापाऱ्याच्या योगदानामुळे उदगीर चा विकास झाला ,आमचे ध्येय एकच आदर्श विद्यार्थी घडविणे हेच आमचे स्वप्न आहे असेही ते म्हणाले,आज आम्ही जे आहोत ते व्यापाऱ्यामुळे या वेळेस अडत वेलफेअर असोसिएशन वतीने उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल बस्वराज पाटील नागराळकर,शिवाजीराव हूडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जगदीश बाहेती,रवींद्र कोरे अडत वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार,नागेश आंबेगाव,साईनाथ कोरे,उमाकांत पांढरे,मल्लिकार्जुन काळगापूरे, श्याम बिरादार, मनोहर बिरादार,शिवाजी पेठे, शिवशंकर बिरादार,मधुकर पाटील, पी. पी.पाटील,साईनाथ कल्याणे,प्रमोद पाटील, कमलाकर भंडे, शांतवीर मुळे,मारुती कडेवार,दिलीप पाटील,दिगंबर गोटमुकले, सुरेश लांडगे,गौतम पिंपरे,विश्वनाथ यलवंतगे, भरत दंडीमे,अरविंद जिरगे,गंगाधर बिरादार,लक्ष्मणराव मोमले, राम बिरादार, संकेत बिरादार,कोंडीराम काळोजी,भिमाशंकर गठोडे सह अडत व्यापारी,सर्व गुमस्था,हमाल उपस्थित होते
Image
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 👉- १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाचीही सुविधा 👉- आठ हजार की.मी. प्रवासाची मर्यादा काढणार उदगीर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. एसटी बस सीट आरक्षित करण्यासाठी १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाची सुविधा देण्यात येईल तसेच आठ हजार की.मी. पर्यंत प्रवासाची मर्यादाही काढणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आधीस्वीकृतीधारक पत्रकारांच्या एसटी बस प्रवासाच्या सवलतींच्या मुद्यावर गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दीपक भातुसे, खजिनदार विनोद यादव, कार्यकारिणीचे सदस्य प्रशांत बारसिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते. सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसप्रकारामध्ये १००% प्रवास भाड्याची सवलत मिळते. मात्र, या सवलतीवर आठ हजार किमीची मर्यादा आहे. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी वारंवार होत असून, ती मंजूर करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच पत्रकारांना एसटीच्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास करण्याची सवलत अनुज्ञेय करावी अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ९ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत केली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या मागणीबाबत सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांना एसटी प्रवासासाठी सद्या ऑनलाइन आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध नाही. येत्या १५ ऑगस्टपासून ऑनलाइन सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पुढील महिन्यापासून घरबसल्या एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी सीट आरक्षित करता येईल. या निर्णयांमुळे पत्रकारांना काम करताना अधिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे आभार मानले.