पत्रकार भवन चे काम निकृष्ट करणारा गुत्तेदार बदलून त्यास काळ्या यादीत टाका= पत्रकार उदगीर= येथील पत्रकार भवनास 4 करोड चा निधी 6 हजार स्कायर फूट बांधकामास देऊन ही संबंधित ठेकेदार मुळातच निकृष्ट काम करत आहे,झालेल्या नाटिस पाण्याचा थेंब नाही ,असे हे करोडो रुपयाचे पत्रकार भवन बांधकाम गुत्तेदाराचे घर भरण्यासाठी असून सदर गुत्तेदार निकृष्ट काम करत असून याने जर पत्रकार भवन चे काम केले तर ते धोकादायक असल्याने त्वरित सबंधित गुत्तेदार बदलावे,त्यास निकृष्ट कामाबद्दल काळ्या यादीत समावेश करण्याची मागणी येथील अनेक पत्रकारांनी मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री,नगरविकास मंत्री,विभागीय आयुक्त,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केले असून त्वरित कार्यवाही न झाल्यास पत्रकार जे आंदोलन करतील त्यास प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन दिले असून आता सार्वजनिक बांधकाम विभाग काय कार्यवाही करते हे पहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी

