पत्रकार भवन चे काम निकृष्ट करणारा गुत्तेदार बदलून त्यास काळ्या यादीत टाका= पत्रकार उदगीर= येथील पत्रकार भवनास 4 करोड चा निधी 6 हजार स्कायर फूट बांधकामास देऊन ही संबंधित ठेकेदार मुळातच निकृष्ट काम करत आहे,झालेल्या नाटिस पाण्याचा थेंब नाही ,असे हे करोडो रुपयाचे पत्रकार भवन बांधकाम गुत्तेदाराचे घर भरण्यासाठी असून सदर गुत्तेदार निकृष्ट काम करत असून याने जर पत्रकार भवन चे काम केले तर ते धोकादायक असल्याने त्वरित सबंधित गुत्तेदार बदलावे,त्यास निकृष्ट कामाबद्दल काळ्या यादीत समावेश करण्याची मागणी येथील अनेक पत्रकारांनी मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री,नगरविकास मंत्री,विभागीय आयुक्त,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केले असून त्वरित कार्यवाही न झाल्यास पत्रकार जे आंदोलन करतील त्यास प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन दिले असून आता सार्वजनिक बांधकाम विभाग काय कार्यवाही करते हे पहावे लागेल
Popular posts
उदगीर विधिज्ञ संघाच्या निवडणूकीत सर्वसमावेशक समतावादी पॅनलचा दणदणीत विजय... अध्यक्षपदी आनंद मुंढे तर उपाध्यक्षपदी गितानंद अक्कनगीरे उदगीर : उदगीर तालुका विधिज्ञ वकील संघाच्या पदाधिकारी निवड २०२५ - २६ साठी २८ मार्च रोजी झालेल्या निवडणूकीत सर्वसमावेशक समतावादी पॅनलचा दनदतीत विजय झाला आसून तालुका विधिज्ञ संघाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष आणि ग्रंथालय सचिव या पदावर उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत तर विधिज्ञ विकास पॅनला सचिव पदावर आपला शिक्कामोर्तब करता आला तर सहसचिव पदावर अपक्ष उमेदवाराने विजय खेचून आणला. चुरशीच्या झालेल्या या अटीतटीच्या निवडणूकीत सर्वसमावेशक समतावादी पॅनलचे उदगीर विधिज्ञ संघाच्या अध्यक्षपदी ॲड .आनंद पंढरीनाथ मुंढे तर उपाध्यक्षपदी ॲड .गितानंद गोविंदराव अक्कनगिरे हे निवडून आले आहेत. विजयी उमेदवार पुढील पुढील प्रमाणे विजयी उमेदवार ॲड. आनंद पंढरीनाथ मुंढे (अध्यक्ष), ॲड .गितानंद गोविंदराव अक्कनगिरे (उपाध्यक्ष), ॲड . चंद्रशेखर वामनराव भोसले (सचिव), ॲड . शरदचंद्र शेषराव पाटील (सहसचिव), ॲड . विजयकुमार सुभाष पाटील माने (कोषाध्यक्ष), ॲड . अमोल तुकाराम कळसे (ग्रंथालय सचिव) या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला तर तत्पूर्वीच ॲड संतोषीमाता मारुती सुर्यवंशी (महिला उपाध्यक्षपदी), ॲड .अश्लेषा चंद्रकांत बिरादार (महिला सहसचिव), ॲड .वर्षा पंकज कांबळे (महिला प्रतिनिधी) हे बिनविरोध निवडून आले आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड . महेश माशाळकर यांनी काम पाहीले तर सहाय्यक म्हणून ॲड . संदीप भांगे यांनी सहकार्य केले. विजयी उमेदवारांचा सत्कार जेष्ठ विधिज्ञ ॲड . गुलाब आण्णा पटवारी, ॲड .एस . टी पाटील , ॲड ' भरत. एम . गुंडरे , ॲड . बालाजी पाटील , ॲड . एस . बी पाटील ' ॲड .बाळासाहेब नवटक्के, ॲड . तानाजी केंद्रे , ॲड . सोपनराव धोंड ,ॲड . तोबरे , ॲड . बी एन बोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

बीदर जिल्हा मराठी पञकार परिषदेच्या अध्यक्षपदी दयानंद बिरादार तर सचिव पदी दत्तात्रय साबणे यांची निवड उदगीर:-अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार शनिवारी (दि.५) भालकी जि. बीदर येथे जनार्धन बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली पञकाराची बैठक संपन्न झाली. या बैठकीत परिषदेचे चिटणीस सचिन शिवशेट्टे यांनी बीदर जिल्हा मराठी पञकार परिषदेची कार्यकारणी जाहीर केली. यात अध्यक्षपदी दयानंद बिरादार, कार्याध्यक्ष तुकाराम मोरे, उपाध्यक्ष दत्तात्रय स्वामी, सचिव दत्ताञय साबने, सहसचिव प्रा. सौ. मिनाक्षीताई पाटील, कोषाध्यक्ष मन्मथ स्वामी कार्यकरिणी सदस्य म्हणून अंकुश वाडीकर, विद्यासागर पाटील, महेश हुलसूरकर, तुकाराम शेडोळे, विनायक शिंदे सल्लागार सदस्य म्हणून माधव पिचारे, पी.आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारणीची निवड झाल्याबद्दल मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख सह उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.. येत्या कार्यकाळात जास्तीत जास्त पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली येतील आणि पत्रकारांचे प्रश्न आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा श्री.एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

पत्रकार दत्ता पाटील यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी हनुमंत घोणसे वर गुन्हा दाखल उदगीर: देवणी येथील दै. देशोन्नती चे तालुका प्रतिनिधि दत्ता पाटील रा.तळेगाव ता.देवणी यांना दारूची बातमी छापल्याचा कारणा वरून जिवे मारण्याची धमकी देण्यात होती या प्रकरणी पत्रकार सौरक्षण कायद्यानुसार देवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतीत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की गेल्या आठवड्यात देवणी तालुक्यातील अवैध देशी दारू जप्त केल्याची बातमी दैं. देशन्नती या दैनिकात प्रकाशित झाली होती. याचा राग मनात धरून माझ्या मुलाची बदनामी करतो का म्हणुन आर्वाच भाषेत शिवागाळ करत परिवारास जिवे मारण्याची धमकी हनुमंत रंगराव घोणसे यांनी पत्रकार दत्ता पाटील यांना दिली होती,या प्रकरणी देवणी पोलिसात पत्रकार दत्ता पाटील यांनी तक्रार दाखल करताच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार हनुमंत रंगराव घोणसे रा. तळेगाव ता. देवणी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या बाबतचा अधिक तपास पोलीस उपअधिक्षक याच्या कडून करण्यात येत आहे.या धमकीचा उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने सर्वात पहले निषेध नोंदवला होता.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
उदगीर नप अभियंता सुनील कटके गायब,पत्नीची पोलीस ठाण्यात तक्रार,शहरात चर्चेला उधाण उदगीर:- उदगीर नप चे अभियंता सुनील कटके हे घरातून निघून गेल्याची तक्रार त्यांची पत्नी संगीता सुनील कटके यानी उदगीर शहर पोलिस स्टेशन ला दिल्याने शहरात चर्चे ला उधाण आल्याचे दिसून येत आहे सुनील शंकर कटके वय 52 वर्ष रा.हावगीस्वामी काॅलेज जवळ नगर पालिकेचे क्वार्टर उदगीर मो नं 8308361234 हे काही एक न सांगता घरातुन निघुन गेले आहेत. अभियंता सुनील शंकर कटके यांची उंची 5 फुट 4इंच, रंग सावळा, नाक सरळ, चेहरा लांबट, कपाळ मोठे,केस काळे पांढरे,अंगात पांढरा चौकडा निळया पटटया असलेला शर्ट,व चाॅकलेटी रंगाची पॅन्ट ,पायात चाॅकलेटी रंगाची चप्पल अशा वर्णनाचे निघुन गेले आहेत वगैरे जबाब आज रोजी पोलीस स्टेशन येथे येवून त्यांची पत्नी संगीता कटके यांनी दिले वरून मा पो नि सो यांचे आदेशाने मिसिंग 02/2025प्रमाणे दाखल करून पुढील तपास कामी पोहेका/ 1398 हारणे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे , नप अभियंता मार्च एंड ला घरातून निघून गेल्याने शहरात चर्चे ला उधाण आल्याचे दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
उदगीरात भव्य मिरवणूकीने भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव संपन्न उदगीर : जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म कल्याण महोत्सव उदगीर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. जैन मंदिरापासून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त आज सकाळपासून भक्तांनी जैन मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. तदनंतर भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला मंडळातर्फे विशेष लेझीम खेळाचे प्रदर्शन करण्यात आले. जैन मंदिरातून निघालेली शोभयात्रा चौबारा, कॉर्नर चौक, पत्तेवार चौक, मुक्कावार चौक, आर्यसमाज, सराफ लाईन मार्गे परत जैन मंदिरात हि शोभयात्रा स्थिरावली. शोभायात्रेच्या सांगता झाल्यानंतर मंदिरात भगवंतांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला व त्यानंतर सर्व उपस्थित समुदायासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत राजकुमार मानवतकर, हिरालाल जैन, पद्मकुमार जैन, कुलभूषण चौधरी, विशाल जैन, पारस जैन, सागर मानवतकर, विजय फुलाडे, सुनील जैन, राजू डोलचीपुरे, नितेश जैन, जवाहरलाल जैन, वर्धमान डोलचीपुरे, रमेश डांगूर अतिवीर डांगूर, कोमल जैन, दिपा मानवतकर, संध्या जैन, शीला जैन, प्रगती जैन, सोनाली जैन, अश्विनी जैन, पिंकी मानवतकर, स्नेहा मानवतकर, सेजल जैन, प्रीती कोंडेकर, श्रद्धा म्हेत्रे, विद्या जबडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

Publisher Information
Contact
Udgirsamachar@gmail.com
9421485971
Udgir samachar office shivaji society udgir
About
Weekly marathi paper published in udgir
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn