*दर्शवेळा अमावस्यानिमित्त लातूर जिल्ह्यात 19 डिसेंबर रोजी स्थानिक सुट्टी* उदगीर : जिल्ह्यासाठी 2025 मधील तीन स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी 20 जानेवारी, 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 19 डिसेंबर 2025 (शुक्रवार) रोजी दर्शवेळा अमावस्या निमित्त जिल्ह्यात स्थानिक सुट्टी राहणार आहे. लातूर जिल्ह्यातील उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये, केंद्रीय कार्यालये, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षेतील कार्यालये वगळता लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, जिल्ह्यातील कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना ही सुट्टी लागू राहील.
Popular posts
उदगीर शहरात हप्तेखोरी मुळे अवैध धंद्याला ऊत:- आ.अमित देशमुख 👉 शहरात मटकेवाले,दारू विक्रेते,प्लॉटिंग कब्जे वाले नगरसेवक उदगीर:- उदगीर शहर एक ऐतिहासिक ,शैक्षणिक शहर असताना आता शहरात हप्तेखोरी मुळे अवैध धंद्याला ऊत आला असून आता जनतेनी हे थांबवण्यास पाहिजे असे उदगार आ.अमित देशमुख यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकी दरम्यान काढले आहे सगळीकडे लातूर पॅटर्न म्हणून लातूर जिल्ह्याची ओळख असताना उदगीर तालुक्या सह शहरात हप्तेखोरी मुळे अवैध धंद्यात वाढ झाली असून परवाच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मटकेवाले,प्लॉटिंग कब्जे वाले, दारू वाले निवडून आले असून यात अनेक जण तर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून यांना कोणाचा वरद हस्त आहे हे सांगण्याची गरज नसून जनतेनी आता या निवडणुकीत बदल घडवून आणणे जरूरी असल्याचे मत ही आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केले असून,अमित देशमुख यांनी सभेतून उघड उघड आरोप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्याचे दिसते
Image
*लातूर जिल्हा परिषदेची अभिनव योजना...* *सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद शाळेत सोलर ऊर्जा* ▪ *जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 153 ग्रामपंचायती आणि 87 शाळा सोलर ऊर्जेनी उजळल्या* ▪ *सोलर ऊर्जेचा वापर करून वीज बील खर्च शून्य करण्याचा प्रयत्न* *उदगीर* लातूर जिल्हा नेहमीच नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात आघाडीवर राहिलेला आहे...त्यातून "लातूर पॅटर्न " हे विशेष नाम लातूरला प्राप्त झाले आहे.लातूर जिल्हा प्रशासन, लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांना नावीन्याचा ध्यासचं लागलेला असतो. त्यामुळे जिल्ह्याचा गौरव फक्त राज्य पातळीवर नाही तर देश पातळीवर होतो. लातूर जिल्हा परिषद यात आघाडीवर आहे. आता जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि शाळा मध्ये एक अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात आणि शाळेत वापरण्यापुरती वीज तळपत्या सूर्यापासून घ्यायची.. यातून वीजेची बचत आणि लाईट बीलाचा खर्च शून्य होईल हा या मागचा हेतू आहे. भारतीय राज्यघटनेतील 73 व्या घटना दुरुस्ती अन्वये पंचायत राज संस्थांना अधिक सक्षम बनविण्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण, अधिकार व जबाबदाऱ्याही दिल्या आहेत. त्यानुषंगाने शासनाने 'आमचा गाव, आमचा विकास' उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार 15 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीच्या वितरणाबाबत प्रमाण निश्चित केले असून एकूण प्राप्त होणाऱ्या निधीपैकी 80 टक्के ग्रामपंचायत 10 टक्के पंचायत समिती 10 टक्के जिल्हा परिषद आहे. या निधीमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुलभूत गरजा भागविण्याबाबत मार्गदर्शन सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी या निधी मधून अपारंपारिक उर्जाचा वापर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत इमारत, शाळा, अंगणवाडी यांच्यासाठी आवश्यकतेप्रमाणे किमान 1 किलो वॉट ची सौर सयंत्र बसविणे बंधनकारक केले आहे. याचा परिणाम म्हणून लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 153 ग्रामपंचायत इमारत व सुमारे 87 शाळांच्या इमारतीवर सौर संयंत्र कार्यान्वयीत करण्यात आले असून त्यामुळे विज बिलामध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्याच बरोबर इतर उर्वरित सर्व ग्रामपंचायत व शाळांमध्ये सौर सयंत्र मार्च 2024 पर्यंत बसविणेबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. *वीजेची आणि पैश्याची बचत* ग्रामपंचायतसाठी यापुर्वी येणारे विजबिल सरासरी 3500 ते 4000 येत होते ही यंत्रणा बसविल्यानंतर विजबिल हे 80 टक्के ने कमी येत आहे.तसेच जिल्हा परिषद शाळेचे यापूर्वी येणारे सरासरी विजबिल 4000 ते 5000 रुपये येत होते परंतू या सौर सयंत्रामुळे त्यात घट होऊन सध्या सदर विजबिल 1000 ते 1500 रुपयाच्या मध्ये येत आहे.शाळा व ग्रामपंचायत वीज बिल खर्च शून्य करण्याचे दृष्टीने आता शाळा व ग्रामपंचायत मध्ये आवश्यकता प्रमाणे सौर पॅनल वाढवण्याच्या पण सूचना दिल्या असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले. *सोलरसाठी येणारा खर्च* 1 किलो वॉट ( 3 सोलार पॅनल, 2 बॅटरी 150 ॲम्पीअर, 1, 1600AMP इनव्हर्टर) चा खर्च अंदाजे 70, 000 हजारापर्यंत येतो. त्याचबरोबर इतर उर्वरित सर्व ग्रामपंचायत व शाळांमध्ये सौर सयंत्र मार्च 2024 पर्यंत बसविणेबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांनी दिली.
Image
निवडणुका संपल्या आता हार तुरे सोडून सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या 👉 फूट पाठीवरून जनतेना चालन अवघड,अनेक व्यापारी प्रतिष्ठान रस्त्यावर ,वाली कोण? 👉 अतिक्रमण हटाव दस्ता गायब, फक्त गाड्यावाल्याचे वजन काटे उचलण्यात पटायीत ? 👉 शिवाजी महाराज चौक,देगलूर रोड दररोज वाहतूक ठप्प, गल्ली बोळातून वाहतूक सुसाट,दररोज अपघात , शिवाजी सोसायटी, यशवंत सोसायटी,सर्वोदय सोसायटी ची जनता त्रस्त 👉 शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर उदगीर:- उदगीर नगरपालिकेच्या निवडणुका संपून अध्यक्षांनी पदभार ही स्वीकारला,जनतेच्या अपेक्षा होत्या की अध्यक्ष सौ स्वाती सचिन हुडे या पदभार घेताच जनतेच्या हिताचे काही निर्णय घोषित करतील पण त्यांना हार तुर्यातून वेळ मिळत नसल्याचे दिसत असून आता त्यांनी हार तुरे सोडून एक वेळेस उदगीर शहराच्या मुख्य रस्त्यावर सकाळी 10 तर सायंकाळी 5ते 7 पर्यंत फेर फटका मारावा जेणे करून सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे,होत असलेल्या हाल त्यांच्या लक्षात येईल,आज सकाळी संध्याकाळी मुख्य रस्त्यावर सोडा नगरपालिकेने करोडो रुपयांचे खर्च करून उभा केलेला फूट पाथ वर चालणे अश्यक झाले आहे,नगराध्यक्षांनी त्वरित अतिक्रमण विभागास सूचना केल्यास काही तासात सर्व सुरळीत होईल पण तेवढा वेळ सध्या दिसत नसल्याचे जाणवते,शहरात सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले असून दोन महिने झाले गटारी साफ केल्या नाहीत,नगराध्यक्ष कडे जादूची कांडी नाही,पण जनतेनी त्यांना ज्या अपेक्षाने निवडून दिले आहे त्याची जाणीव त्यांनी ठेऊन ,लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्या प्रमाणे सुरुवात करावी हीच अपेक्षा
6 वर्षीय मुलीवर मुस्लिम युवकाचा लैंगिक अत्याचार, वलांडी बंद 👉 वलांडी सह पंचक्रोशीतील नागरिकांनी उस्फुर्त वलांडी बंद करत दोन तास निलंगा उदगीर मुख्य रस्ता रोको करून आरोपीस फासी देण्याची केली मागणी उदगीर= देवणी तालुक्यांतील वलांडी येथील अल्ताफ महेबुब खुरेशी या नराधमाने 6 वर्षीय हिंदू मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने वलांडी पंचक्रोशीतील नागरिकांनी आज वलांडी बंद ची हाक देत दोन तास निलंगा उदगीर मुख्य रस्ता रोको करून आरोपीस फासी देण्याची मागणी केली,या नराधमाविरुद्ध देवणी पोलिस ठाण्यात गु र क्र 28/24 कलम 376(AB)376,(2)(N)377,506 भादवी सह कलम 3(1)(W)(i)3,2(V) अ .जा. ज. प्र. का सह कलम 46 पोस्को अन्तर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निलंगा येथील उपविभागीय पोलिसअधिकारी कटेकर हे करत आहेत,ही घटना 15 जानेवारी 2024 ते 19 जानेवारी 2024 दरम्यान घडली असताना 25 जानेवारी 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यातआला असून आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन , वलांडी येथील शुक्रवार चा आठवडी बाजार असुनही वलांडी कडकडीत बंद पाळण्यात आले
Image
लातूर,निलंगा मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसेस बंद करून , बसस्थानाकाचेही काम तात्काळ पूर्ण करावे उदगीरच्या प्रवाशी संघटनेची मागणी उदगीर---या आगारातून लातूर व निलंगा मार्गावर सुरू असलेल्या भंगार बसेस तात्काळ बंद करून येथील गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेले उदगीर बसस्थानाकाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे. उदगीर बस आगारातून लातूर व निलंगा मार्गावर भंगार झालेल्या बसेस सुरू आहेत.या बसेसना दीडपट तिकीट आकारले जात आहे. भंगार बसेसमुळे मोठी हानी होण्याचा संभव आहे.सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. या बसेसमधील वातानुकूलित सेवा पूर्ण बंद पडली आहे. पावसाळ्यात या बसेसला भेगा पडल्या असल्यामुळे पावसाळ्यात अक्षरशः प्रवाशांनी बसमध्ये छत्र्या लावून प्रवास केला आहे. या भंगार झालेल्या बसेस भंगार झाल्यामुळे या बसेस तात्काळ बंद करून या दोन्ही मार्गावर लालपऱ्या सुरू करण्याची मागणी या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच उदगीर बस स्थानकाचे काम गेल्या नऊ वर्षांपासून मंद गतीने सुरू आहे.पावसाळ्यात चिखल व उन्हाळ्यात धुराळ्याने प्रवाशी त्रस्त होत आहेत.या बंद पडलेल्या बस स्थानकाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणीही प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी व सचिव व्ही. एस. कुलकर्णी यांनी आगार प्रमुख,विभाग नियंत्रक, प्रादेशिक व्यवस्थापक व परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.
Image