अपनी राधाकृष्ण गौशाला लातूर के कैलेंडर का विमोचन उदगीर की नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. स्वाती सचिन हुडे के हाथो संपन्न उदगीर:- लातूर की प्रसिद्ध अपनी राधा कृष्ण गौशाला प्रतिष्ठान लातूर के 2026 कैलेंडर का विमोचन अभी-अभी भारी बहुमत से चुनके आए भाजपा उदगीर के नवनिर्वाचित नगर अध्यक्ष सौ.स्वातिताई सचिन हुडे उनके हाथों से किया गया इस समय गौ भक्त सौ मीरा झंवर,अनिल झंवर,लक्ष्मीकांत कालिया, सत्यनारायण सोनी , शिवाजीराव हुडे आदि
Popular posts
दत्त मंदिर परिसरातील भव्य सभागृहाची लवकरच उभारणी करणार =मा.मंत्री संजय बनसोडे 👉संताच्या वाणीतून समाजाला ऊर्जा मिळते : *उदगीर* : उदगीर मतदारसंघ हा एक ऐतिहासिक असून या मतदारसंघात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या संख्येने होत आहेत. राज्यातून विविध भागातून संत या ठिकाणी येऊन त्यांचे अनमोल विचार समाजातील नागरिकांपुढे व्यक्त करत असतात. या सर्व संतांच्या वाणीतून समाजाला नवी ऊर्जा मिळत असुन आपल्या पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होत असल्याचे मत राज्याचे माजी क्रीडा मंत्री तथा उदगीरचे आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर शहरातील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजीत एकदिवसीय प्रवचन सोहळ्या प्रसंगी भाविकांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी गुंडानाथ महाराज, चक्रीनाथ महाराज, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, माजी नसरसेवक सुधीर भोसले, सोसायटीचे अध्यक्ष विजयकुमार पारसेवार, भागवत पारसेवार, सुरेश महाजन, बालाजी पोलावार, संजय कलकोटे, साईप्रसाद पारसेवार, सुयोग कोटलवार, विनोद कपाळे, शिवकुमार कांबळे, धिरज कसबे, गणेश गायकवाड, शहाजी पाटील, सावन पस्तापुरे, प्रीती कवतीकवार, डी.एस. बिरादार, सतिश पाटील माणकीकर, आदीनाथ चिकटवार, मल्लिकार्जुन लंजवाडकर, केशव पाटील, सावित्री पारसेवार, गोदावरी महाजन, मनीषा मुक्कवार, स्मिता मुक्कावार, ओम पिंगळे, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, आपल्या आमदारकीच्या व मंत्रिपदाच्या कार्यकाळात शक्य होईल तेवढ्या सर्व धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण आपण केले आहे. विविध ठिकाणी सभा मंडप उभारण्यात आले आहेत. भविष्यात उदयगिरी बाबा किल्ला परिसरात विद्युत रोषणाई करण्याचा आपला मानस असुन मागील काळात श्री गुरु हावगीस्वामी महाराज मठाला निधी दिला. श्री सिध्दरामेश्वर मठासह श्री रेणुकाचार्य संस्कार भवन उभारले, श्री गुरु हावगीस्वामी लिंगायत भवन उभारले असुन चौकीला मठालाही निधी दिला असल्याचे सांगितले. या येत्या वर्षाभरात या सोसायटीतील श्री दत्त मंदिर परिसरात सभामंडप उभारणार असल्याचे सांगून सर्वांना आ.बनसोडे यांनी श्री दत्त जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री दत्त जयंतीनिमित्त आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते आरती करुन भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी भाविक - भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Image
चंदन बस्वराज पाटील नागराळकर सह अनेक राष्ट्रवादी (शरद पवार)कार्यकर्ते काँग्रेस मध्ये उदगीर:- नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच काँग्रेस पक्षाला बळकटी देणारी मोठी घडामोड घडली असून बाभळगाव निवासस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरद चंद्र पवार) प्रदेश कार्याध्यक्ष श्री चंदन पाटील नागराळकर, उदगीर शहर युवक अध्यक्ष अजय शेटकर, उदगीर तालुका युवक अध्यक्ष कृष्णा घोगरे, कपिल समगे, ओम काळा, बंटी कद्रे, मनोज हावा, बसवराज शेटकर या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या तरुण कार्यकर्त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे उदगीर शहर आणि तालुक्यातील काँग्रेस संघटना अधिक मजबूत झाली असून, होऊ घातलेली नगरपरिषद निवडणूक आणि आगामी काळात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल असा विश्वास अमित देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. उदगीर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संतोष बिराजदार यांचेही याप्रसंगी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव कल्याण पाटील, उदगीर नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेतील काँग्रेसचे निरीक्षक रवींद्र काळे, तसेच माधव कांबळे पद्माकर उगिले ज्ञानोबा गोडभरले विजयकुमार चवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते।
Image
*दर्शवेळा अमावस्यानिमित्त लातूर जिल्ह्यात 19 डिसेंबर रोजी स्थानिक सुट्टी* उदगीर : जिल्ह्यासाठी 2025 मधील तीन स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी 20 जानेवारी, 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 19 डिसेंबर 2025 (शुक्रवार) रोजी दर्शवेळा अमावस्या निमित्त जिल्ह्यात स्थानिक सुट्टी राहणार आहे. लातूर जिल्ह्यातील उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये, केंद्रीय कार्यालये, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षेतील कार्यालये वगळता लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, जिल्ह्यातील कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना ही सुट्टी लागू राहील.
स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही, गुत्तेदारांनी वीज ग्राहकांना विनाकारण त्रास देऊ नये - स्वप्निल जाधव उदगीर = सध्या लातूर जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू झाली आहे. वास्तविक पाहता वीज कायदा 2003 च्या कलम 55 प्रमाणे स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही. असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ प्रदेशाचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी सर्व वीज ग्राहकांना कळविले आहे. याची नोंद वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही आवाहन युवा नेते स्वप्निल जाधव यांनी केले आहे. वीज मीटर बदलण्यासाठी येणारे ठेकेदार आहेत. ती एक नोडल एजन्सी आहे. या नोडल एजन्सीला आपण वीज मीटर लावू नका, असे स्पष्ट सांगावे असेही विधीज्ञ दर्यापूरकर यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात कोणत्याही कायद्यानुसार सरकारी कामात अडचण आणणे ही केस आपल्यावर या बाबतीत लागू होऊ शकत नाही. स्मार्ट मीटर लावायला आलेल्या लोकांना हे मीटर लावणे आवश्यक असल्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या आदेशाची, परिपत्रकाची प्रत मागावी. जी ते तुम्हाला देऊ शकत नाहीत. असेही वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे. हे मीटर लावणे सर्वांनी ताबडतोब बंद करावे. कारण या मीटरच्या वेगवान फिरल्याने विज बिल भरता भरता आपल्याला अतोनात त्रास होणार आहे. एकदा का जर हे मीटर आपण लावले तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही. याची सर्वांनी जाणीव ठेवावी, असेही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने म्हटल्याचे स्वप्निल जाधव यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना स्वप्निल जाधव यांनी मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालाचाही हवाला दिला आहे. मध्यप्रदेश हायकोर्टने वीज ग्राहकांना स्पष्ट केले आहे की स्मार्ट मीटर लावणे हे अनिवार्य नाही. थाई स्वरूपातील मिटर घेत असतील तर त्यांच्यासाठी ते अनिवार्य आहे मात्र नियमित ग्राहकांसाठी ते अनिवार्य नाही. संदर्भात विधिज्ञ शरद जोशी यांच्या म्हणण्यानुसार वीज ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवणे हे कायद्याने अपराध ठरू शकेल जबरदस्ती करून मीटर जर कोणी बसवत असेल तर तो उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरेल अशा पद्धतीच्या महत्त्वपूर्ण न्यायालयीन कारवाई बद्दल सीहोर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत वर्मा यांनी आभार मानले आहेत, स्मार्ट मीटर बसवणे हे खाजगी कंपनीने कंत्राट घेऊन शासनाच्या काही लोकांना हाताशी धरून हे काम चालू केले आहे. भविष्यात हे मीटर रिचार्ज सिस्टीम चे होणार आहेत. त्यामुळे राज्यात त्याचा विरोध सुरू असताना तुमच्या घरी येऊन जबरदस्तीने मीटर बसवण्याचे काम वीज वितरण कंपनी करत असेल तर त्यांना ताबडतोब विरोध करावा. जीनियस या कंपनीचे मीटर ज्यांच्या घरी बसवले आहे, त्यांना आता दुप्पट बिल येऊ लागले आहेत. याकडे महाराष्ट्र विज ग्राहक संघटनेने लक्ष वेधले आहे. भविष्यात आपली लुबडणूक होणार नाही यासाठी जनतेने स्मार्ट मीटरला तीव्र विरोध करावा या संदर्भामध्ये काही स्वयंसेवी संस्था स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना तयार करत आहेत तशा पद्धतीचा अर्ज ग्राहकाने महावितरणला देऊन त्याची पोचपावती घ्यावी त्यासाठी सर्वांनी सावध राहावे असेही आवाहन जाधव यांनी केले आहे.
Image