*उदगीर येथे 1 मार्च रोजी ‘मराठी बाणा’ महानाट्याचे आयोजन* 👉 सायंकाळी 5 ते 6 पर्यन्त स्थानिक कलाकारांना आपली कला दाखविता येईल उदगीर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ‘महासंस्कृती महोत्सव’ अंतर्गत उदगीर येथे 1 मार्च 2024 रोजी ‘मराठी बाणा’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आला आहे. शहरातील तालुका क्रीडा संकुल (जिल्हा परिषद क्रिडा मैदान) येथे सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होईल. उदगीर येथे आयोजित ‘मराठी बाणा’ महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी केले असून या वेळेस तहसिलदार राम बोरगावकर,नायब तहसिलदार संतोष धाराशिवकर हे उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
