मोटारसायकल विकून फसवणूक,धमकी गुन्हा दाखल उदगीर:- शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की राहुल पंढरी बिरादार वय 30 वर्ष रा -हंचनाळ ता देवणी जि.लातूर यास आरोपी अविनाश गंगाराम कांबळे रा -कुमठा खुर्द ता उदगीर जि लातुर. यांनी फिर्यादीस स्पेंलेडर गाडी क्र एम एच 24 बीपी 2248 विक्री करतो म्हणुन एकुन 55000 रुपये घेवुन बाउंड वर साक्षीदारासमक्ष नोटरी करुन दिले की, एमएच 24 बीपी 2248 गाडीवर कोणत्याही प्रकारचा अपघात RTO दंड पोलीस केस कोणत्याही कंपनीचा फायनस कर्ज बोजा नाही असल्यास त्याला मी जबाबदार राहील असे लिहुन दिले होते या गाडीवर 22000. रुपये फायनास आहे आरोपी यास माझी फसवणुक का केली अशी विचारणा केली असता खुप शहाणा झालास का रे तगंड तोडुन टाकीन साल्या जर जास्त शहानपणा केलास तर तुझ्यावर अॅट्रासिटी ची केस करतो म्हणुन धमकी दिली आहे वगैरे मजकुर फिर्याद जबाब वरुन मा.पो.नि.सो यांचें आदेशाने गुन्हा र. नं .405/25,कलम 318(4),351(2)(3)BNS दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि मोहीते हे करीत आहेत.
• श्रीनिवास मदनलाल सोनी