उदगीर नवीन औद्योगिक वसाहती साठी कासराळ परिसरातील 124.24 हेक्टर जमीन घेण्याचे आदेश 👉 क्रीडा युवक कल्याण व बंदरे मंत्री श्री संजयजी बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश उदगीर:- उदगीर ला नवीन औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी उदगीर चे आमदार तथा महाराष्ट्राचे क्रीडा युवक कल्याण व बंदरे मंत्री श्री संजयजी बनसोडे यांनी अथक प्रयत्न करुन कासराळ परिसरात 124.24 म्हणजे 310 .60 एकर जमीन घेण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961चे प्रकरण 6 कलम 2 खंड (ग) नुसार तरतुदी लागू करण्याचे आदेश दिले असून या मुळे येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी प्रयत्नास यश आलें असून येथील खाजगी 310 एकर वर भव्य औद्योगिक वसाहत निर्माण होणारं असल्याने सर्व स्तरातून मंत्री महोदयांचे अभिनंदन होत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी