विकास पाहून उद्घाटना पूर्वीच नूतन तसील इमारतीस फुटला पाझर! उदगीर:- उदगीर येथील प्रशासकीय जुन्या इमारती पाडून नव्या इमारती साठी करोडो चां निधी आला ,या निधीतून टोलेजंग प्रशासकीय इमारती उभ्या राहत असून त्यात तसिल ची इमारत असून ती इमारत पहिल्याच पावसात इतकी गळत आहे की पाहणारे बोलत आहेत की येथील विकास पाहून उद्घाटनापूर्वी तसिल च्या नूतन इमारतीच्या भिंतीस पाझर फुटल्याचे बोलत आहेत
Popular posts
अपनी राधाकृष्ण गौशाला लातूर के कैलेंडर का विमोचन उदगीर की नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. स्वाती सचिन हुडे के हाथो संपन्न उदगीर:- लातूर की प्रसिद्ध अपनी राधा कृष्ण गौशाला प्रतिष्ठान लातूर के 2026 कैलेंडर का विमोचन अभी-अभी भारी बहुमत से चुनके आए भाजपा उदगीर के नवनिर्वाचित नगर अध्यक्ष सौ.स्वातिताई सचिन हुडे उनके हाथों से किया गया इस समय गौ भक्त सौ मीरा झंवर,अनिल झंवर,लक्ष्मीकांत कालिया, सत्यनारायण सोनी , शिवाजीराव हुडे आदि
Image
रामकथाचार्य शशिशेखर महाराज यांच्या रामकथेस उसळला जनसागर उदगीर= येथील सिग्नल नंबर 2,हनुमान नगर येथील हनुमान मंदिर परिसरात आयोजित शशिशेखर महाराज यांच्या रामकथेची 29 नोव्हेंबर शनिवारी रोजी भव्य सुरुवात झाली असून सदरील रामकथेचे 7 डिसेंबर रविवार रोजी समापन होणार असून ही कथा दररोज दुपारी 2 ते 5 वाजे पर्यंत सुरू आहे,या रामकथेस भक्ताचा जनसागर उसळला असून सर्व परिसर राममय झाल्याचे दिसून येत आहे,सदरील परिसरातील रहिवाश्यांनी या कथे चे आयोजन केले असून याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही आयोजकांनी केले आहे
Image
शिवसेना (शिंदे) गटाच्या अंकित पत्की चा प्रभाग 19 मधुन प्रचाराचा भव्य शुभारंभ 👉 माझी प्राथमिकता घर भरणे नाही नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे 👉 प्रत्यक्ष गाठीभेटी, समस्या जाणून घेण्यावर भर 👉 उच्चभ्रू असलेला प्रभाग 19 मध्ये मागील काळात सत्तेत असलेल्या नगरसेवकाच्या निष्काळजी मुळे प्रभागात अनेक समस्या उदगीर : प्रभाग क्रमांक १९ चे उच्चशिक्षित (शिवसेना)शिंदे गटाचे उमेदवार अंकित पत्की यानी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून गेल्या पाच वर्षांच्या नगरसेवक कार्यकाळात आणि चार वर्षांच्या प्रशासकीय काळात वार्डातील कामे ठप्प झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्टपणे नमूद केले. अंकित पत्की म्हणाले की, "मागील नगरसेवकाकडून वार्डातील साफसफाई, दैनिक कचरा व्यवस्थापन, रस्त्यांवरील खड्डे यांसारखी मूलभूत कामेदेखील समाधानकारक झाली नाहीत.यांनी प्रभागाचा नाही स्वतःचा विकास केला असल्याने प्रभागातील हालत खराब आहे,मी प्रभागाचा चेहरा मोहरा बदलेन आपण मला एकदाच संधी द्या, मी संधी चे सोने करेन ,मूलभूत सुविधा सह नागरिकाचे कामे घरपोच देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, शिवसेनेत अनेक वर्ष कार्यरत असल्याचा उल्लेख करताना ते पुढे म्हणाले की, "आज आपलं सरकार राज्यात आहे, उपमुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत त्यामुळे विकासाची दारे अधिक उघडू शकतात. आपण फक्त आशीर्वादरूपी एक संधी द्यावी मी संधी चे सोने करेन अशी ग्वाही ही त्यांनी दिली असून त्यांच्या प्रचाराने प्रभाग 19 मधील मतदार आकर्षित होत असल्याचे दिसत आहे
Image
शिवसेना उदगीर नगरपालिका स्वबळावर लढणार= मा. आमदार सुधाकर भालेराव 👉 नगरविकास खाते एकनाथ शिंदे कडे असल्याने शिवसेना उदगीर चा विकास भूतो न भविष्यती करू 👉 नगरपालिका हद्दीतील भ्रष्टाचार मिटवणार 👉 मुस्लिम समाजाला सोबत घेऊन विकास करू 👉 मागील काळातील विकास माझ्या कार्यकाळातील 👉 केलेल्या कामाची प्रसिद्धी न केल्याचे खंत 👉उदगीरकराच्या हितासाठी,सर्वांगीण विकासासाठी मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलो असून मी आता गप्प बसणार नाही 👉 उदगीर, अहमदपूर नगरपालिका निवडणूक शिवसेना स्वतंत्र लढवणार असून जनतेनी आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन सहकार्य करतील असे सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे
Image
चंदन बस्वराज पाटील नागराळकर सह अनेक राष्ट्रवादी (शरद पवार)कार्यकर्ते काँग्रेस मध्ये उदगीर:- नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच काँग्रेस पक्षाला बळकटी देणारी मोठी घडामोड घडली असून बाभळगाव निवासस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरद चंद्र पवार) प्रदेश कार्याध्यक्ष श्री चंदन पाटील नागराळकर, उदगीर शहर युवक अध्यक्ष अजय शेटकर, उदगीर तालुका युवक अध्यक्ष कृष्णा घोगरे, कपिल समगे, ओम काळा, बंटी कद्रे, मनोज हावा, बसवराज शेटकर या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या तरुण कार्यकर्त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे उदगीर शहर आणि तालुक्यातील काँग्रेस संघटना अधिक मजबूत झाली असून, होऊ घातलेली नगरपरिषद निवडणूक आणि आगामी काळात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल असा विश्वास अमित देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. उदगीर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संतोष बिराजदार यांचेही याप्रसंगी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव कल्याण पाटील, उदगीर नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेतील काँग्रेसचे निरीक्षक रवींद्र काळे, तसेच माधव कांबळे पद्माकर उगिले ज्ञानोबा गोडभरले विजयकुमार चवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते।
Image