शिवसेना (शिंदे) गटाच्या अंकित पत्की चा प्रभाग 19 मधुन प्रचाराचा भव्य शुभारंभ 👉 माझी प्राथमिकता घर भरणे नाही नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे 👉 प्रत्यक्ष गाठीभेटी, समस्या जाणून घेण्यावर भर 👉 उच्चभ्रू असलेला प्रभाग 19 मध्ये मागील काळात सत्तेत असलेल्या नगरसेवकाच्या निष्काळजी मुळे प्रभागात अनेक समस्या उदगीर : प्रभाग क्रमांक १९ चे उच्चशिक्षित (शिवसेना)शिंदे गटाचे उमेदवार अंकित पत्की यानी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून गेल्या पाच वर्षांच्या नगरसेवक कार्यकाळात आणि चार वर्षांच्या प्रशासकीय काळात वार्डातील कामे ठप्प झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्टपणे नमूद केले. अंकित पत्की म्हणाले की, "मागील नगरसेवकाकडून वार्डातील साफसफाई, दैनिक कचरा व्यवस्थापन, रस्त्यांवरील खड्डे यांसारखी मूलभूत कामेदेखील समाधानकारक झाली नाहीत.यांनी प्रभागाचा नाही स्वतःचा विकास केला असल्याने प्रभागातील हालत खराब आहे,मी प्रभागाचा चेहरा मोहरा बदलेन आपण मला एकदाच संधी द्या, मी संधी चे सोने करेन ,मूलभूत सुविधा सह नागरिकाचे कामे घरपोच देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, शिवसेनेत अनेक वर्ष कार्यरत असल्याचा उल्लेख करताना ते पुढे म्हणाले की, "आज आपलं सरकार राज्यात आहे, उपमुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत त्यामुळे विकासाची दारे अधिक उघडू शकतात. आपण फक्त आशीर्वादरूपी एक संधी द्यावी मी संधी चे सोने करेन अशी ग्वाही ही त्यांनी दिली असून त्यांच्या प्रचाराने प्रभाग 19 मधील मतदार आकर्षित होत असल्याचे दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
