राज्यात रक्तसाठ्याचा तुटवडा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन रक़्त दान करा
:-रक्तदान केल्याने करोनाचा धोका नाही हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं
करोनाशी आपण दोन हात करतो आहोत. सगळेच आपल्या परिने आम्हाला सहकार्य करत आहेत. मात्र सध्या राज्यात रक्तसाठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावं असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आवाहन केलं. रक्तदान केल्याने करोनाचा कोणताही धोका नाही. मात्र रक्तदान करतानाही फार गर्दी करु नका असंही त्यांनी म्हटलं आहे. या शिवाय गरज पडल्यास महाराष्ट्राच्या सीमाही बंद करु जेणे करुन हे संकट टाळता येईल असंही त्यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी हा संवाद साधला आहे.
राज्यात रक्तसाठ्याचा तुटवडा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन रक़्त दान करा