फक्त सापळा बघुनच प्रवासी खुश?
:- उदगीर रेलवे स्टेशन वरील पादचारी पुलाचा नुसता सापळा उभारून मागील दोन महिन्यापासून अधिकारी व ठेकेदार गायब
उदगीर रेल्वे स्टेशनवर प्रवाश्याची हेळसांड थांबावी म्हणून पादचारी पुलाची उभारणी करण्याचे 2018 मधे घोषित केले खरे पन मागील दोन महिन्यापासून नुसता सांगाडाच उभारून सगळे गायब असल्याने प्रवाशी परेशान आहेत
उदगीर रेल्वे स्टेशनवर दररोज हजारो प्रवासी ये जा करतात,रात्री जास्त गाड्या येतात एकावेळेस दोन गाड्या आल्या की दुसरी गाडी दोन नंबर प्लेटफॉर्म वर घेतली जाते पन या प्लेटफॉर्म वरुन प्रवाश्याना येन्याची सोय नसल्याने अनेक दिवसापासून पादचारी पुलाची मागणी होती ती जाणुन 2018 मधे पुल निर्मिती ची घोषना केली 2019 मधे पुलाचा सांगाडा उभा करन्यात आला खरा पन मागील दोन महिन्यापासुन नुसता सांगाडा उभा करुण दमरे चे अधिकारी व ठेकेदार गायब आहेत या मुळे येथे रात्री प्रवास करनारया प्रवाश्याना फारच परेशान व्हावे लागत असुन ही या बाबत दमरे च्या अधिकार्याना काहीही देनेघेने दिसत नाही असे दिसते तर ब्रिज निर्मिती डीसीएम हे फोन वर काही बोलत नाहीत असा सांगाडा आता किती दिवस उभे राहणार हे कोणीच सांगत नसल्याने महिला व जेस्ट नागरिकाचे हाल होत आहेत
फक्त सापळा बघुनच रेलवे प्रवासी खुश?