प्रशासनाची विनंती कृपया संचारबंदी काळात विनाकारण बाहेर पडू नका:- उपजिल्हाधिकारी डॉ.प्रविण मेंगशेट्टी
:-नाहीतर प्रशासनास कठोर कार्यवाही करावी लागेल
:- भाजी विक्रेते व फळ गाडेवाल्यास जि.प.मैदान येथे कोरोना काळात जागा उपलब्ध ,शनिवार 28 मार्च पासून जनतेनी तेथूनच खरेदी करावी
उदगीर:- सम्पुर्ण जगात करोना महामारी ने हाहाकार घातला असताना भारत सरकारने 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केल्या नंतर ही उदगीर येथील जनतेस या महामारीची कुठलीच चिंता दिसत नाही ही फार गम्भीर बाब असुन,जनतेनी प्रशासनाने ठरऊन दिलेल्या नियमातच बाहेर यावे अन्यथा प्रशासनास कठोर कार्यवाही करावी लागेल असे आवाहान उपजिल्हाधिकारी डॉ.प्रविण मेंगशेट्टी यानी केले आहे
प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली असताना उदगीर शहरातील काही टवाळखोर हे विनाकारण गाडी वरुण बिनबोबाट बाहेर फिरत आहेत,जनता ही विनाकारण अत्यावश्यक खरेदी च्या नावावर बाहेर येत आहेत,उदगीर मधे अत्यावश्यक सर्व सेवा नियमित सुरु रहानार असुन कुठल्याच वस्तु चा तूटवडा नसतानाही लोक विनाकारण खरेदी च्या नावावर बाहेर फिरत आहेत हे फारच घातक असुन जनतेनी स्वताच्या जिवाची काळजी ठेऊन वागावे,प्रशासन हे जनते साठी काम करत आहेत पन जर कोणी याचा दुरुपयोग करत असेल तर प्रशासनास कठोर व काही कडक निर्णय घ्यावे लागतील या साठी आमची हाथ जोडून विनंती आहे की जनतेनी प्रशासनास सहकार्य करावे व विनाकारण संचारबंदी काळात बाहेर फिरु नये
प्रशासनाची विनंती कृपया संचारबंदी काळात विनाकारण बाहेर पडू नका:- उपजिल्हाधिकारी डॉ.प्रविण मेंगशेट्टी :-नाहीतर प्रशासनास कठोर कार्यवाही करावी लागेल