जी भीती होती तेच घडले,उदगीर मधे 1 महिला कोरोना बाधित
:- राज्य बंदी,जिल्हा बंदी,प्रतेक तालुका बंदी असताना सदरील महिला गुजरात हुन उदगीर ला आली कसी ?
उदगीर:- उदगीर करा मधे मागील अनेक दिवसा पासून कोरोना बद्दल जी भीती होती ती आज उघड झाली असुन एक 35 वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अवहाल आल्याने उदगीर कराची झोप उडाली आहे
उदगीर मधिल एक 35 वर्षीय महिला दोन दिवसा पुर्वी गुजरात हुन उदगीर येथे आल्याची माहिती प्रशासनास मिळाली होती त्या आधारे या महिलेस प्रशासनाने त्याब्यात घेउन तिचा स्याब तपासणी साठी पाठवला होता,ती महिला कोरोना बाधित असल्याची चर्च्या उदगीर शहरात वारया सारखी पसरली असता उदगीर कराची झोपच उडाली,याची माहिती लातूर चे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय ढगे याना विचारली असता त्यानी उदगीर समाचार ला फोन वरुण बोलताना सादरील महिला कोरोना बाधित असल्याचा अवहाल आल्याची माहिती दिली ,एक महिला कोरोना बाधित असल्याचे सिद्ध झाल्याने प्रशासन ही सतर्क झाले असुन पुढील उपाय योजने संबंधी प्रशासनाची वरिस्ट स्तरावर बैठक चालूअसल्याचे समजते
जी भीती होती तेच घडले,उदगीर मधे 1 महिला कोरोना बाधित