उदगीरच्या पत्रकारांनी उतरवली जिल्हाधिकाऱ्याची आकड !
राज्यमंत्र्यासमक्ष पत्रकारांचा अपमान ! तरीही बनसोडे गप्पच !
:- लोका सांगे ब्रम्हज्ञान--- -- म्हणी प्रमाणे जिल्हाधिकारी यांचे वागणे होते,शिव भोजन केंद्राचे उद्घाटन असताना,राज्यमंत्री यानी मास्क घातले होते तर जिल्हाधिकारयानी ना मास्क घातले होते ना येथील चपाती तपासत असताना हात सेनटराइज केले याची चर्च्या उद्घाटना नंतर जोरात चालू होती
उदगीर:- बैठकीस राज्यमंत्री संजय बनसोडे यानी पत्रकाराना आमंत्रित,जिल्हाधिकारी यानी पत्रकाराना काढले बाहेर
उदगीर येथे आज राज्यमंत्री संजय बनसोडे व जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या हस्ते शिव भोजन केंद्राचे उद्घाटन व कोरोना सन्धर्बात आढावा बैठक होती बैठकीस राज्यमंत्री यानी पत्रकाराना आमंत्रित केले होते पन जिल्हाधिकारी यानी पत्रकाराना बैठकीतून बाहेर काढल्याने पत्रकारानी सभागृहा बाहेर ठिया देउन पत्रकारानी जिल्हाधिकारयाचा धिक्कार म्हणून घोषना दिल्याने हा परिसर दणाणून गेला
उदगीर येथे आज राज्यमंत्री संजय बनसोडे व जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या हस्ते नपा संकुल बाजूस शिव भोजन केंद्राचे उद्घाटन झाले या नंतर कोरोना सन्धर्बात आढावा बैठक शिवाजी महाविद्यालय सभागृहात आयोजित केली होती ,या बैठकीस राज्यमंत्री यानी पत्रकराना आमंत्रित केले होते,या बैठकीचे अधक्ष राज्यमंत्री असताना जिल्हाधिकारी यानी पत्रकारांना सभागृहाच्या बाहेर काढल्याने पत्रकारानी संताप व्य्क़्त करत सभागृहा बाहेर ठिय्या मांडला,बैठक संपल्या नंतर राज्यमंत्री यानी येउन पत्रकाराची माफी मागीतली पन पत्रकारानी राज्यमंत्री मोठा का जिलाधिकारी मोठा,राज्यमंत्री यानी पत्रकारास निमंत्रण दिले म्हणून पत्रकार आले असताना जिल्हाधिकारी यानी पत्रकारान बाहेर काढले असताना राज्यमंत्री गप्प का म्हणताच राज्यमंत्री यानी परत दिलगिरी व्यक़्त केली पन या वर पत्रकाराचे समाधान न झाल्याने उपस्थीत पत्रकारांनी जिल्हाधिकारयाचा धिक्कार म्हणून घोषना देऊन सगळा परिसर दणाणून सोडला असता जिल्हाधिकारी यानी गपचुप आपल्या गाडीत बसुन निघुन जाणेच योग्य समजून ते निघुन गेले
उदगीरच्या पत्रकारांनी उतरवली जिल्हाधिकाऱ्याची आकड ! राज्यमंत्र्यासमक्ष पत्रकारांचा अपमान ! तरीही बनसोडे गप्पच