धान्य द्या हो साहेब,गोर गरिबाची आर्त हाक ?
:-आधार लिंक साठी प्रशासनाने मागील काळात लाखो रुपये खर्च केले पन ते लिंक वाल्यास न देता अधिकार्यानी उचलून घेतल्याने लिंक करणारा काम अर्धे सोडून निघुन गेला असी चर्च्या तसील परिसरात जोरात चालू असुन ते लाखो रुपये खिशात घालणारा अधिकारी कोन? याचा प्रशासनाने तपास करुण त्याच्यावर कार्यवाही केली तर पुरवठा विभागातील मागील काळातील फार मोठा घोटाळा समोर येईल असी चर्च्या ही तसील परिसरात ऐकावयास मिळत आहे
उदगीर:- उदगीर शहर व परिसरातील अनेक राशन कार्ड धारकाचा आधार लिंक नसल्याने राशन दुकानदार त्याना धान्य देत नसल्याने अनेक जन तसील कार्यालयाच्या चकरा मारताना दिसत आहेत
उदगीर शहर व परिसारातिल नागरीक लॉकडाऊन कार्यकाळात कोणीही उपासी राहू नये म्हणून शासनाने प्रतेक राशन कार्ड धारकास धान्य देन्याचे घोषित केले त्या प्रमाने उदगीर मधे धान्य आले खरे पन आधार लिंक नाही म्हणून अनेक राशन कार्ड धारकास राशन दुकानदार हे धान्य न देता परत पाठवत आहेत,हे लोक परेशान होऊन तसील कार्यालयाच्या चकरा मारत असुन येथे त्याना कोणीच मार्गदर्शन करत नसल्याने हे लोक किलोभर धान्यासाठी परेशान दिसत आहेत,असेच काही परेशान राशन कार्ड धारकानी सकाळी 10 वाजता तसील कार्यालय परिसरात तसिलदार वेंकटश मुंडे याना भेटून आपली कैफियत मांडली या वेळेस तसिलदार यानी ज्यांचे आधर लिंक नाहित त्यानी संबंधित दुकानदारा कडे त्वरित आपले आधर कार्ड ची प्रत देऊन धान्य घ्यावे जर कोणत्या दुकानदाराची तक्रार आल्यास त्याच्यावर कडक कार्यवाही केली जाईल असे सांगितले,तर तसील परिसरात मागील काळात आधार लिंक साठी प्रशासनाने जी रक्कम दिली होती ती रक्कम मागील पुरवठा विभागाच्या एका अधिकार्यानी खिशात घातली ,त्या मुळे लिंक करनारा लिंक चे काम अर्ध्यावर सोडून गेला ?याची चर्च्या तसील परिसारात दबक्या आवाजात चालू असल्याचे दिसत आहे
धान्य द्या हो साहेब,गोर गरिबाची आर्त हाक ?