सीमाभागातील श्रीक्षेत्र चाळकापूर येथे हनुमानांचे जागृत देवस्थान

 


सीमाभागातील श्रीक्षेत्र चाळकापूर येथे हनुमानांचे जागृत देवस्थान
उदगीर :- विविध रूपे घेणारे अशाच श्री हनुमान जागृत देवस्थान वसलेले आहे ते कर्नाटक राज्यातील चाळकापूर ता.भालकी जिल्हा बिदर याठिकाणी भाविक  नवसाला पावणारे मंदिर म्हणून बारामहिने गर्दी करतात. या मंदिरात सकाळी श्री हनुमानांचे बाल रूप दुपारच्या सुमारास युवक रूप व सायंकाळच्या सुमारास वृध्द रूपे असे दर्शन या ठिकाणी मिळत असल्याचे भाविक अख्ययिका सांगतात. महाराष्ट्रातून गोदावरी हि नदी कर्नाटकराज्यात जाते. सदर नदी ही चाळकापूर जवळ असलेल्या नारंजा नदीला जोडते. याच ठिकाणी श्री हनुमानांचे भव्य मंदिर आहे. बिदर जिल्हयातील भालकी तालुक्यात चाळकापूर हे गाव आहे. सदर गाव छोटेसे असून गाव फार सुदंर आहे. या गावाला एक वेगळा इतिहास आहे. या गावालगत एक नदी असून त्यानदीचे नाव हे नारांचा नदी आहे. सदर नदी ही गोदावरी नदीसोबत जोडली जाते. चाळका हे एका देवीचे नाव आहे. जी देवी सदा पर्वतावर राहते जे की चाळकापूर जवळ आहे. याच पर्वताला संजीवनी पर्वत म्हणून संबोधले जाते. याच गावात श्रीरामांचे व श्रीहनुमानांचे भव्य मंदिर आहे. चाळका देवीचे सदैव वास्तव्य या ठिकाणी असल्याने या गावाला चाळकापूर हे नाव पडले. याठिकाणी विविध रूपे धारण करणारे श्री हनुमानांचे मंदिर असल्याने या गावाला एक इतिहास आहे. या ठिकाणी हनुमानांचे विविध रूपांचे दर्शन घेण्यासाठी भाविक दिवसभर मुक्कामी राहातात. सकाळच्या सुमारास या मंदिरात श्री हनुमानांचे बालरूप दुपारी युवक रूप व सांयकाळी वृध्द हनुमानांचे रूप पाहण्यासाठी भाविक एकच गर्दी करतात. या ठिकाणी वर्षातून दोन वेळा भव्य जत्रा भरते. याच मंदिरात प्रतिदिन कूंकमपुजा, अंलकारपुजा व गंधअलंकार पुजा नचुकता होत असते. भालकी तालुक्यातील चाळकापूर याठिकाणी श्रीहनुमान जयंती निमित्य भाविकांची तोबा गर्दी असते. नवसाला पावणारा श्री हनुमान मंदिर म्हणून भाविक याठिकाणी मोठया प्रमाणात ये-जा करतात. या मंदिरा शेजारी संजीवनी पर्वत असल्याने याठिकाणी ज्यावेळी रामायाणात लक्ष्मणाला युध्दाप्रसंगी लक्ष्मणशक्ती लागते त्यावेळी संजीवनी बेटावरून संजीवनी हि वनस्पती श्रीहनुमाने आणली असल्याचे सुध्दा या ठिकाणी इतिहासात नमूद आहेत. चाळकापूर हे गाव पर्वत रांगेत वसले असल्याने याठिकाणी पर्यटक निर्सगाचा अनमोल नजराणा पाहण्यासाठी व श्रीहनुमानांचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर गर्दी करतात.


Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image