उदगीर करानो सुधरा,नाहीतर फार मोठी किंमत मोजावी लागेल !
:- पेन्शन उचलण्यास पेन्शन धारकाची बँकेत कसरत,हे सगळे पेन्शन धारक जेस्ट नागरीक,सामाजिक अन्तराचा बट्ट्याबोळ
:- पोलीस प्रशासन व प्रशासनाच्या अवाहाना नंतर ही उदगीर कर नाहीत गंभीर?
उदगीर:- उदगीर कराच्या आरोग्या साठी प्रशासन 24 तास सतर्क असुन,प्रशासनाचे वरिस्ट अधिकारी वारन्वार लॉकडाऊन व सामाजीक अंतराचे पालन करुण घरातच रहाण्याचे आवाहान करत असताना,काही जन जाणुन बुजुन घराबाहेर पडत असुन हे लोक स्वता होऊन गंभीर धोका घेत असल्याचे दिसत आहे
एकीकडे देश्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी,दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबत उदगीर चे उपजिल्हाधिकारी डॉ प्रविण मेंगशेट्टी,उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर,नपा मुख्याधिकारी भरत राठोड़,पो.नि.महेश शर्मा,सोपान सिरसाठ सोबत सर्व अधिकारी व कर्मचारी हे सगळ्याना कोरोना सन्धर्बात सतर्क करुण लॉकडाऊन काळात घरात रहाण्याचे व सामाजीक अंतर राखण्याचे आवाहान करत असताना उदगीर येथील काही जन त्यांचे आवाहान हे मजाक समजून घाराच्या बाहेर निघत आहेत या मुळे पोलीस प्रशासनावर फार मोठा तान निर्माण होत असताना,उदगीर येथील पेन्शन धारक हे पेन्शन उचलण्या साठी एस.बी.आय.बँकेत एवढी गर्दी केली आहे की ते एकावर एक पडत असल्याचे दिसत असुन या लोकाना जर पाहिले तर असे वाटते की उद्या बँकेतून पेन्शन मिळनार नाही का? हे सर्व पेन्शन धारक 60 वर्ष्या च्या वरील जेस्ट नागरीक असुन कोरोनाचा धोका याना जास्त असुन ही हे लोक स्वता होउन असा धोका घेत आहेत हे फार काळजी करणारे असुन जर या पैकी एकास ही जर या कोरोनाची लागण झाली तर उदगीर कराना फार मोठी किंमत मोजावी लागेल असे दिसते
उदगीर करानो सुधरा,नाहीतर फार मोठी किंमत मोजावी लागेल !