पो.उप निरीक्षक गजानन पाटील यांना निलंबित करा- उदगीर तालुका मराठी पत्रकार संघ
उदगीर:-
येथील दैनिक दंडाधिकार चे पत्रकार अनिल जाधव हे 31 मार्च रोजी सकाळी 8-40 वाजता उदगीर येथील शिवाजी चौकात पेपर पार्सल आणण्यास गेले असता उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील यांनी काही कारण नसताना अमानुष मारहाण केली. असुन त्यांना त्वरित निलंबित करा व पत्रकार सुनिल हावा यांचे कार्यालय अज्ञाताने जाळन्याचा प्रयत्न केला होता त्या अरोपीवर ही कार्यवाही करा असे निवेदन उदगीर तालुका मराठी पत्रकार संघा तर्फे गृहमंत्री,मुख्यमंत्री व संबंधित विभागाला दिले आहे.
सध्या पोलीस प्रशासन हे पत्रकाराचा वचका काढत आहेत का असे वाटत आहे,कारन लॉकडाऊन मधे लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंग घोणे यांना लातूर येथे झालेली अमानुष मारहाण,हिंगोली येथील घटना व मंगळवार 31 मार्च रोजी उदगीर येथील शिवाजी चौकात दैनिक दंडाधिकार चे पत्रकार अनिल जाधव यांना उदगीर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस उ प निरीक्षक गजानन पाटील यांनी काहीच कारण नसताना अमानुष मारहाण केली आहे,ही पत्रकाराना मारहाण नसून चौथ्या स्तंभाचे खच्चीकरण असुन,उदगीर येथील घटने साठी जबाबदार पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील यांना त्वरित निलंबित करावे,पत्रकार सुनिल हावा यांच्या स्टार दर्पण न्यूज़ चनल चे कार्यालय आज्ञाताने जाळन्याचा प्रयत्न केला होता त्याची रितसर तक्रार पोलीस ठाण्यात दिली असुन अरोपीस त्वरित अटक करा अस्या मागणी चे निवेदन उदगीर तालुका मराठी पत्रकार संघा तर्फे गृहमंत्री,मुख्यमंत्री,गृहसचिव,पोलीस महानिरीक्षक,विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड़,जिल्हाधिकारी लातूर,पोलीस अधिक्षक लातूर,उपजिल्हाधिकारी उदगीर,उपविभागीय पोलीस अधिकारी यांना उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्या मार्फत देण्यात आले असुन या निवेदनावर इरफ़ाण शैख, बिभीषण मद्देवाड,सिद्धार्थ सुर्यवंशी,सचिन शिवशेट्टे,रामभाऊ मोतिपवळे,सुनिल हावा,विक्रम हालकीकर,बश्वेश्वर डावळे,सुधाकर नाईक,बस्वराज बिराजदार ,शंकर बोईनवाड,सुनिल सुतार,अरविंद पत्की,अंबादास अलमखाने,श्रीनिवास सोनी,विधीज्ञ गोविंदा सोनी,ईश्वर सुर्यवंशी,संगम पटवारी,श्रीकृष्ण चव्हाण,विश्वनाथ गायकवाड, विधीज्ञ श्रावणकुमार माने,देशमुख फेरोज,महादेव घोणे,रविंद्र हसरगुंडे, बबन कांबळे आदि च्या सह्या आहेत.
पो.उप निरीक्षक गजानन पाटील यांना निलंबित करा- उदगीर तालुका मराठी पत्रकार संघ