उदगीर साठी धोक्याची घंटा? आज 10 रुग्ण पॉजिटिव
:- अश्या ही परिस्थितीत व्यापारयार्ची बाजार चालू करण्याची मागणी:- राज्यमंत्री श्री संजय बनसोडे
:- आनंद नगर (नांदेड़ नाका)व ग्रामीन पोलीस ठाण्याच्या परिसरातील नागरिकाची उडाली झोप
फोटो:-प्रतिबंधीत क्षेत्र क्र 5 सोमनाथपूर ची पहाणी करतेवेळी अपर जिल्हाधिकारी पाठक, उपविभागीय अधिकारी डॉ प्रविण मेंगशेट्टी, तहसीलदार वेंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी चव्हाण
:- उदगीर मधील 21 कोरोना बाधित रुग्ण बरे होउन घरी गेले याचा आनंद उदगीर कराना काही तासच मिळाला आणी परत काल नविन 2 कोरोना पिडीत रुग्ण सापडले होते आज परत 10 रुग्ण सापडल्याने उदगीर कराची चिंता वाढली असुन ही एक धोक्याची घंटा दिसत आहे
उदगीर येथील मागील काळात 28 कोरोना रुग्ण सापडले तर एकाचा मृतू झाल्याने उदगीर ला मागील 57 दिवसा पासून लॉक डाऊन तर 2 वेळेस कर्फू लावावे लागले,या नंतर 28 पैकी 11,4,6 असे 21 रुग्ण बरे होउन घरी गेले तर पुढील दोन दिवसात बाकी 7 रुग्ण ही चांगले असल्याने ते घरी जाणार व उदगीर परत ग्रीन झोन मधे येणार असी भावना घेउन उदगीर कर पुढील दिवसाची प्रतिक्षा करत असतानाच शुक्रवारी रात्री नविन 2 रुग्नाचा अवाहाल पॉजिटिव आला तर आज परत 10 रुग्णाच अवाहाल पॉजिटिव आला आहे, दोन दिवसात उदगीर चे काही दुकाने चालू होतील ही अपेक्षा असताना आता नविन रुग्ण सापडल्याने प्रशासन काय भुमिका घेते हे पहावे लागेल,कोरोना चे एवढे रुग्ण सापडुन ही उदगीर येथील प्रशासन या बाबत काहीही सांगण्यास तयार का दिसत नाही हा प्रश्न उदगीर कराना पडत आहे,प्रशासनाने रुग्ण कोणत्या भागात सापडला एवढे जरी सांगितले तरी त्या भागातील लोक जागरुक रहातील व कोरोना चा पुढील प्रसार जरुर थांबेल असे अनेकाचे म्हनने दिसत आहे,परत परत नविन रुग्ण सापडणे ही उदगीरकरासाठी धोक्याची घंटा तर नाही ना हा ही प्रश्न अनेकाना पडत आहे,अस्या ही परिस्थितीत व्यापारयानी राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा कडे बाजार चालू करण्याची मागणी केल्याचे व त्यावर विचार करनार असल्याचे मंत्री महोदयांनी उदगीर समाचार ला सांगितले तर रुग्ण वाढीने प्रशासन सतर्क झाले आहे
उदगीर साठी धोक्याची घंटा? आज 10 रुग्ण पॉजिटिव