उदगीरात रविवार पर्यंत संचारबंदी
:- शासकीय कर्मचारी त्यांचे वहाने,मैडिकल,दुध,पाणी,पुरवठा,शासकीय व खाजगी दवाखाने यानाच परवानगी
:- प्रशासनाची सक़्त ताकीद,कोणी ही विनाकारण बाहेर येऊ नये घरातच रहावे
उदगीर:-उदगीरात काल कोरोना चे 7 नविन रुग्ण मिळाल्या नंतर ही उदगीर करानी जी हलगर्जी दाखवली होती त्याची दखल घेउन प्रशासनाने उदगीर मधे 3 दिवस म्हणजे रविवार 10 मै रोजी रात्री 12 पर्यंत संचार बंदी घोषित केली असुन यात फ़क़्त अत्यावशक सेवा ना सुट दिली आहे
उदगीर मधे कोरोना रुग्णाची संख्या दहा दिवसात 1 वरुण 21 झाली,रुग्णाची वाढती संख्या व सकाळी खरेदी च्या नावाखाली बाहेर फिरणारया ची संख्या पहाता प्रशासनाने कडक पाऊल उचलले असुन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यानी 7/5/2020 रोजी जा.क्र.2020/एमएजी/कक्ष 1/कावी 755 ने आदेश काढून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 प्रमाने दिनांक 10/5/2020 रोजी रात्री 12 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे सदर कालावधीत सर्व शासकीय कार्यालय त्यांचे कर्मचारी,त्यांची वहाने,सर्व शासकीय वहाने ,शासकीय व खाजगी दवाखाने,औषधी दुकाने,शासकीय निवारा गृह ,गैस सेवा, घरपोच पिण्याचे पाणी ,दुध वितरण , वैद्यकीय अपातकाल सेवा अत्यावशक सेवेचे विशेष पास असणारे वाहने अथवा व्यक्ती याना मुभा देण्यात आली आहे. अत्यावक्षक सेवेच्या वेवस्थे बाबत नपा मुख्याधिकारी यानी तर सोमनाथपूर,निड़ेबन,मादलापुर,मलकापूर बाबत गट विकास अधिकारी व ग्रामसेवक याना अधिकार देण्यात आले आहेत
उदगीरात रविवार पर्यंत संचारबंदी