उदगीरकरानो सावधान,नाहीतर फार मोठी किंमत मोजावी लागेल!
:- 1 चे 21 झाले तरी उदगीर कराचे डोळे काही उघडता उघडेनात
:-पहाटे पाच ला उघडत आहेत कपड्याचे दालन तर जनरल स्टोर,शू मार्ट,अटोमोबोईल, ड्रेसेस,गिफ्ट सेंटर ,फ्रूट ची बिनदिक्कत खुली दुकाने
उदगीर:- उदगीर ला कोरोना चा विळखा घट्ट होत चालला असल्याचे दिसत असुन ही उदगीर कर हे बिन बोभाट ,खुले आम कुठलीच जिवाची पर्वा न करता बाहेर फिरत आहेत,या बाबी इतक्या घातक आहेत की उदगीर कर त्वरित सुधरले नाहित तर याना फार मोठी किंमत मोजावी लागेल असे दिसत आहे
उदगीर ला 10 दिवसात कोरोना बाधित रुग्नाचा आकडा हा 1 वरुण 21 वर गेला,यात एकाचा मृतू ही झाला,प्रशासन डोळ्यात तेल घालुन कडा पहारा देत आहेत,लोकांच्या जिवासाठी ते दिवस रात्र एक करत असताना उदगीर करानी स्वता काळजी घेणे जरुरी असताना हेच लोक विनाकारण रस्त्यावर बिन दिक्कत फिरत आहेत,याना या गंभीर बाबीची काहीच चिंता नसल्याचे दिसत आहे ,दुसरीकडे काही कापड शोरुम वाले पहाटे पाच लाच आपले दालन मागील व पुढील छोटे शेटर उघडून ग्राहकी करत आहेत,प्रशासनाची सक़्त ताकीत असताना काही जनरल स्टोर,ड्रेसेस,शू मार्ट,अटोमोबोईल ,फ्रूट वाले हे आपली दुकाने उघडत आहेत याना प्रशासन का अभय देतय हे समजत नाही,पोलिसाची गाडी आली की तेवढे हे बंद करतात व परत दुकाने उघडत असल्याचे चित्र दिसत आहे,तर काही जन भाजी खरेदी च्या नावाखाली नाईक चौकात गर्दी करत आहेत तर काही मॉर्निंग वाक च्या नावाखाली पहाटे बाहेर पडत आहेत याना कसे समजत नाही की कोरोना हा त्यांच्या दारात यमराज म्हणून उभा आहे,उदगीर करानी जर या बाबी कडे दुर्लक्ष केले तर उदगीर कराना याची येनारया काळात फार मोठी किंमत मोजावी लागेल असे दिसते
उदगीरकरानो सावधान,नाहीतर फार मोठी किंमत मोजावी लागेल!