उदगीर मधे कोरोना चा दुसरा मृतू, उदगीर करानो सावधान !
:-आनंद नगर (नांदेड़ नाका)येथिल 65 वर्षीय पुरुषाचा आज दोपारी 12-45 ला मृतू,त्याला उच्य रक़्त्दाब,मधुमेह,निमोनीया ही होता:- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय ढगे
:- राज्यातील चौथा लॉक डाऊन 31 मे पर्यंत
उदगीर:- उदगीर येथील 65 वर्षीय पुरुष कोरोना चा दुसरा मृतू ठरला असुन या पुर्वी 68 महिलेचा कोरोना मुळे मृतू झाला होता,तर आज राज्य सरकार ने कोरोना रुग्ण वाढल्याचे पाहुन लॉक डाऊन चा चौथा टप्पा 31 मे पर्यंत जाहीर केला आहे
उदगीर च्या आनंद नगर (नांदेड़ नाका )येथील 65 वर्षीय पुरूषास 2 दिवसाखाली उदगीर च्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते त्याचा परवा कोरोना अवाहाल पॉजिटिव आला होता त्या इसमाचा आज दोपारी 12-45 वाजता मृतू झाला असुन त्यास उच्य रक़्त्दाब,मधुमेह व निमोनीया चा ही त्रास होता असे लातूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय ढगे यानी प्रसिध्द केले आहे उदगीर मधिल कोरोना चा हा दुसरा मृतू असुन या पुर्वी 68 वर्षीय महिलेचाही मृतू झाला होता तर आज
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चौथ लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याची मुदत 17 मे रोजी संपत आहे. पण, कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा चौथा टप्पा घोषित करण्यात आला आहे. हा टप्पा 31 मे 2020च्या मध्यरात्रीपर्यंत राहणार आहे.
राज्यसरकार तर्फे एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यात कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
उदगीर मधे कोरोना चा दुसरा मृतू, उदगीर करानो सावधान