लाइफ केयर च्या माध्यमातून "उदगीर" चे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जाईल :-सुधाकर भालेराव
लाइफ केयर येथील साई मूर्ती ची प्रतिष्ठापना व काही विभागाची सुरुवात 30 मे रोजी करत असून, या लाइफ केयर च्या माध्यमातून आम्ही जी सेवा देणार आहोत या मुळे उदगीर चे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जाइल असे मत मा. आम. सुधाकर भालेराव यानी उदगीर समाचार सोबत बोलताना व्यक्त केले आहे
उदगीर व परिसरातील जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी आम्ही व आमचे लाइफ केयर चे सर्व जण अहोरात्र प्रयत्न करणार असून, आम्ही हा दवाखाना कुठल्याही रुग्णास जीवनदान ठरेल हेच ब्रीद घेऊन 30 मे रोजी श्री साई च्या मूर्ती ची प्रतिष्ठापना करून सुरू करत आहोत, आम्ही लाइफ केयर च्या माध्यमातून जी सेवा देणार आहोत असी सेवा इतर कुठल्याही दवाखाण्यात मिळणार नाही असी अद्यावत सेवा आम्ही देणार असून आता या भागातील नागरिकांनी मोठ्या शहरात जाण्याची जरूरत भासणार नाही,ही सर्व सुविधा अत्यल्प दरात असेल ज्याचा फायदा या परिसरातील जनतेस होईल, जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे ग्रामीण भागातील एकमेव सुसज्य असा दवाखाना येथे सुरू होत असल्या मुळे उदगीर चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदविले जाईल हे मी सांगतो असे उद्गार लाइफ केयर चे प्रमुख तथा मा. आम. सुधाकर भालेराव यानी उदगीर समाचार सोबत बोलताना व्यक्त केले आहे, येथे लवकरच मास्टर डिग्री, मेडिकल, नर्सिंग कॉलेज ही चालू करणार असल्याचे त्यांनी सांगितले