लोणी येथील मयत सारी चा रुग्ण
:-उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण 583 रुग्णाची तपासनी त्या पैकी 50 रुग्ण पॉझिटिव्ह
:-उदगीर शहर 39,बोरताळातांडा 9,चीमाचीवाडी 1,लोणी 1,,
-सध्या उपचार चालू पुरुष 12,स्त्रिया 9 एकूण 21
-मृत 3,पुरूष 2,स्त्री 1
उदगीर:- उदगीर तालुक्यातील लोणी येथील 78 वर्षीय मृत व्यक्ति चा मृत्यू सारी या रोगाने झाल्याचा आवाहाल आज जिल्हा शल्य चिकित्सक यानी दिलेली आहे
परवा लोणी येथील 78 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता काल ती व्यक्ती कोरोंना बाधित असल्याचे सांगण्यात आले होते, पण आज लातूर जिल्हा शल्य चिकित्सक यानी सदरील रुग्ण हा सारी चा होता असे सांगितले आहे, लातूर जिल्ह्यातूंन 1305 रुग्णाची तपासणी करण्यात आली या पैकी 1190 चे आवाहाल प्राप्त झाले, 115 चे प्रलंबित, 4 ची पुनर्र तपासणी, 1104 निगेटिव्ह तर 82 पॉझिटिव्ह आहेत, उदगीर उपजिल्हा रुग्णालयात एकूण 583 रुग्णाची तपासणी करण्यात आली होती त्या पैकी 50 पॉझिटिव्ह आहेत, यात उदगीर शहर 39, बोरताळा तांडा 9, चीमाचीवाडी 1,लोणी 1 आहे, आज मितीस उपजिल्हा रुग्णालयात 12 पुरुष व 9 स्त्रीया उपचार घेत आहेत तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे यात 2 पुरुष तर 1 महिला आहे असे सांगण्यात आले आहे, यात खडकाली, मुसानगर, मदीना नगर येथील contentment झोन 17 /5!2020 ला संपले असून आनंद नगर, सोमनाथपूर ग्रामीण, बोरताळा तांडा, गोविंद नगर, हनुमान कट्टा, चीमाचीवाडी, हंगरगा येथे containment झोन चालू आहे तर उदगीर येथील एकास 24/5/2020 ला, बोरताळा तांडा येथील 9 जनास व गोविंद नगर येथील एकास 25/5/2020 ला, आनंदनगर येथील तिघास 26/6/2020 ला, चीमाचीवाडी येथील एकास 28 /5/2020 ला, हंगरगा येथील तिघास व उदगीर येथील एकास 30/5/2020 ला तर उदगीर येथील एकास 31/5/2020 ला रुग्णालयातुन सुट्टी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यानी दिली आहे