*
*उदगीर* :-आज वट सावित्री पोर्णिमा निमित्त आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे म्हणुन सौभाग्यवती महिलानी वट वृक्ष पूजन मोठया प्रमाणात केले
पुराणिक आख्यायिका आहे की सावित्री ने वटवृक्षा खाली आपल्या मृत पतीस सत्यवानास जिवंत केले होते, या वटवृक्षा वर ब्रम्हा, विष्णु व महेश हे तिन्ही देव वास करतात म्हणुन तेंव्हा पासून सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्या साठी वटवृक्षा ची पूजा करतात या दिवसी या वृक्षाला पाणी घालून हळद कुंकू अर्पण करतात व धाग्याने या वृक्षा भोवती बांधतात या मुळे घरात सौभाग्य प्राप्ती होते असी आख्यायिका आहे, उदगीर शहरातील अनेक ठिकाणी वट वृक्षाची पूजा करताना अनेक सौभाग्यवती दिसत होत्या कोरोंना मुळे सगळ्यानी सामाजिक अन्तर ठेऊन पूजा करत असल्याचे दिसून आले