50 वर्षा वरील सर्व उदगीर कराची रविवारी आरोग्य तपासणी:- अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे
:-185 पथका मार्फत तपासणी
:- ज्याचे ऑक्सिजन लेवल 95 च्या खाली असेल त्यांनी त्वरित दक्षता घ्यावी
उदगीर :-उदगीर शहरांतील 50 वर्षा वरील सर्व जनतेची रविवारी 185 पथका मार्फत तपासणी करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे यांनी सांगितले आहे
उदगीर शहरात या पुढे कोरोंना चा प्रसार वाढू नये म्हणुन प्रशासनाने आरोग्य विभागा मार्फत शहरांतील 50 वर्षा वरील सर्व जानतेची 185 पथका मार्फत तपासणी करण्यात येणार आहे, या तपासणीत पलस मिटर, थर्मा मिटर अश्या अद्यावत उपकरणाने तपासणी करण्यात येणार असल्याचे लातूर चे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली, त्यांनी उदगीर शहरातली 50 वर्षा वरील सर्वानी तपासणी करून प्रशासनास सहकार्य करावे असी विनंती ही केली आहे, या पत्रकार परिषदेस उदगीर चे उपजिल्हाधिकारी डॉ प्रविण मेंगशेट्टी, तहसीलदार वेंकटेश मुंडे,नपा मुख्याधिकारी भारत राठोड, डॉ हरिदास, गट विकास अधिकारी चव्हाण, डॉ रामप्रसाद लखोटीया,बसवराज पाटील नागराळकर, रमेश अंबरखाने नायब तहसीलदार खरात सोबत सर्व पत्रकार उपस्थित होते