ऐकावे ते नवलच, एका युनिट चे बिल 57 रू. 85 पैसे
:-महावितरण ने दिवसा लुटण्याचा प्रयत्न केला सुरू
उदगीर :- महावितरण ने सामान्य ग्राहकांना दिवसा लुटण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसत असून ग्राहकास 14 यूनिट चे बिल चक्क 810 रुपये म्हणजे चक्क 57 रू 85 यूनिट दिले असून या मुळे ग्राहकांची झोपच उडाली असल्याचे दिसत आहे
सध्या महावितरण ने सामान्य ग्राहकांना दिवसा लुटण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे कारण की येथील अधिकार्यांनी महावितरण ला एमपैनलमेंट च्या आधारे पूर्ण पिळून काढले आहे त्याची भरपाई म्हणून की काय महावितरण कंपनीने ग्राहकाला अवास्तव बिल देऊन लुटण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे, येथील काशिनाथ जवळे ग्राहक क्र 622010117543 याना 14 यूनिट चे बिल चक्क 810 रुपये म्हणजे प्रति यूनिट 57 रू. 85 पैसे प्रमाणे दिले आहे, हा भाव जगात कोठेही नाही पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उदगीर मध्ये लावला असल्याने या ग्राहकाची झोपच उडाली असल्याचे दिसत आहे हे तर सोडा महावितरण ने चक्क लॉक डाऊन मुळे एप्रिल महिन्यात दुकान बंद असून ही त्यांनी 34 यूनिट वापरल्याचे त्यांचे म्हणणे आहे, महावितरण कंपनीच्या बाबत आता ग्राहकांना ऐकावे ते नवलच म्हणण्याची वेळ आली आहे