उदगीर शहराने गाठले अर्धशतक, उदगीर करानो सावधान, कोरोंनाचा विळखा वाढतोय
:- उदगीर शहराने गाठले अर्धशतक
:-चिल्लरगे गल्ली व आंबेसंगे गल्ली( चौबारा ) नवीन contentment क्लस्टर झोन जाहीर
:- बुधवारी उदगीर येथून 48 जनाचे स्याब तपासणी साठी लातूर ला पाठवले
उदगीर कोरोंना मुक्ति कडे वाटचाल करत असताना परत येथे नवीन कोरोंना रुग्णाची भर व त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्ति या मुळे उदगीर परत कोरोंना हॉट स्पॉट होतो की काय हा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे
उदगीर येथे मागील काळात कोरोंना चे अनेक रुग्ण आढळून आले, यात अनेक जण बाहेर गावाहून आलेले होते तर काही शहरांतील, कोरोंना मुळे तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे, उदगीर येथील 47+3=50,बोरताला तांडा 9, चीमाची वाडी 2,लोणी 1, कासराळ 7,देवर्जन 6,वाढवना येथील 1 असे 76 रुग्ण झाले असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे, काल 10/6/2020 बुधवारी येथून 48 जनाचे स्याब तपासणीला पाठवल्याचे डॉ हरिदास यानी सांगितले आहे, कोरोंना मुक्ति कडे वाटचाल करत असताना येथे परत जी रुग्ण संख्या वाढत आहे ती फारच घातक ठरू शकते कारण की येथील सर्व व्यवहार सुरू असून अनेक ठिकाणी सामाजिक अन्तर चे भान ठेवल्याचे दिसत नाही तर अनेक दुकानात जाऊन पाहिले तर लोकांना कोरोना चे गांभीर्य दिसत नाही, प्रशासन ही सांगून थकल्या चे दिसत आहे, उदगीर करानी जर हे गांभीर्य लक्षात घेऊन काही केले नाही तर त्यांना आगामी काळात फार मोठी किम्मत मोजावी लागेल हे निश्चित दिसत आहे कारण की जर आजच प्रतिबंध नाही केल्यास पुढील काही दिवसात कोरोना चे रुग्ण वाढण्याची दाट शक्यता दिसत आहे, आज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी चिल्लरगे गल्ली व आंबेसंगे गल्ली नवीन क्लस्टर containment झोन जाहीर केला आहे