उदगीर :-उदगीर शहराच्या मुख्य रस्त्यावर दुकानदारांनी अतिक्रमण करून रस्त्यावरच दुकानातील सामान थाटले होते आज स्वतः उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नपा मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी रस्त्यावर उतरून कार्यवाही केल्याने अनेक दुकानदारांचे ढाबे दणाणले आहे
उदगीर शहराच्या मुख्य रस्त्यावर अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानातील साहित्य ठेऊन वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता, मुख्य रस्त्या वरुण फिरणे अवघड झाले होते, त्यात ऑटो रिक्षा वाले हे रस्त्या च्या मध्यभागी अचानक ऑटो उभे करत आहेत तर या दुकानदारांना अनेक वेळेस सांगून ही त्यांच्यावर काहीच फरक पडत नसल्याने स्वतः उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांनी तहसीलदार वेंकटेश मुंडे, नपा मुख्याधिकारी भारत राठोड, पुलिस निरीक्षक वसंत चव्हाण याना घेऊन अतिक्रमण केलेल्या दुकानावर कार्यवाही चालू केल्याने अनेक दुकानदारांचे ढाबे दणाणले आहेत तर काहीनी अधिकारी आल्याचे व कार्यवाही करण्यात येत असल्याचे पाहून आपले दुकाने बंद करून पोबारा केल्याचे दिसत आहे, आज केलेल्या कार्यवाही चे सर्व स्तरातून कौतुक होत असून आता प्रशासनाने कडक कारवाई करावी व मुख्य रस्त्या वरील अतिक्रमण काढून रस्ता वाहतुकीस मोकळा करावा असी ही मागणी समोर येत आहे