उदगीर :-देवनी तालुक्यातील हंचनाळ येथील 35 वर्षीय शेतकर्यांने सततची नापिकी व कर्जास कंटाळून आपल्या शेतातील विद्युत वहिनीस स्पर्श करून आत्महत्या केली आहे
हंचनाळ येथील राजकुमार माणिकराव कळसे (35) या शेतकर्यांने सततची नापिकी व कर्जास कंटाळून आपल्या शेतातील विहिरीवर आलेल्या विद्युत विभागाच्या तारेस पकडून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघड झाले, त्याचा मृत देह पंचनामा करून देवनी येथील शासकीय रुग्णालयात पोस्ट मार्टम साठी घेऊन गेला असून त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ,पत्नी एक मुलगा 1 4 वर्षाचा तर एक मुलगी 10 वर्षाची आहे, त्याच्या मृत्यू ची बातमी समजताच हंचनाळ गावावर शोक कळा पसरली आहे