उदगीर :- सोमनाथपूर ता. उदगीर येथील उमाकांत तोंडारे यांनी उदगीर येथील कृषी दुकानातून महाबीज चे सोयाबीन बी खरेदी करून पेरणी केली होती ते बियाणे निकृष्ट दर्जाचे असून उगवले नाही म्हणुन त्या कृषी दुकानावर व बीज प्रक्रिया कंपनी वर कार्यवाही करून नुकसान भरपाई देण्याची मागणी संबंधीत शेतकर्यांनी प्रशासनाला केली आहे
सोमनाथपूर येथील शेतकरी उमाकांत वैजनाथ तोंडारे यांनी उदगीर येथील मे. गणेश कृषी सेवा केंद्र येथुन 23/5/2020 रोजी पावती क्रमांक 733 ने महाबीज कंपनी चे सोयाबीन 335 बी खरेदी केले होते त्याचा सीएफ. टी एफ. सी आर ऑक्टो19-13-3808-5146,5151 असून 30 किलो च्या 12 बॅग 2200 प्रमाणे 26400 रुपये देऊन खरेदी केले होते ते 14/6/2020 रोजी शेतात पेरणी केली पण 4 ते 5 दिवसात उगवणारे सोयाबीन हे 8 दिवस होऊन ही उगवले नसल्याने उमाकांत तोंडारे यांनी आज 22/6/2020 रोजी उदगीर चे तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या कडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित दुकानदार व बियाणे कंपनी वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व माझे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे