उदगीर :येथील अक्षर नंदन शाळेने प्रशासनाचे आदेश पायदळी तुडवून कोरोंना काळात मनाई असताना विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून क्लास घेतला त्या बद्दल प्रशासनाने शाळेचे मुख्याध्यापक, संस्था अध्यक्ष व सचिवा विरुद्ध ग्रा. पुलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असला तरी उपशिक्षण अधिकार्यांनी जो आवाहाल दिला आता त्या चौकशी समितीचीच चौकशी होणे आवश्यक आहे असी चर्चा शहरात चालू आहे
अक्षर नंदन शाळेने जिल्हाधिकारी आदेश जा. क्र. 2020 /एम ए जी /कक्ष 1/कावी 816 दिनांक 31/5/2020 अन्वये शिक्षण संस्थान सुरू ठेवण्यासाठी मनाई केली होती त्याचे उलंघन केले म्हणुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार यांनी नायब तहसीलदार खरात व मंडलाधिकारी जाधव यांना शाळेत पाठवून सत्यता पडताळून सत्य आहे म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक, संस्था अध्यक्ष, सचिव यांच्या विरुद्ध ग्रा. पोलिस ठाण्यात गुन्हा रजी 236/2020 ने भारतीय दंड संहिता 1860 कलम 188,34 साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 कला 3 महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 प्रमाणे दाखल केला पण शिक्षण विभागाने उप शिक्षण अधिकारी ज्ञानेश्वर मोरे याना सोबत केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण, गट शिक्षण अधिकारी उदगीर याना तपास करून आवाहाल देण्यास सांगितले त्या नुसार संबंधितांनी तपास करीत असा आवाहाल दिला शाळेने कोविड व ऑनलाइन शिक्षणाची माहिती साठी विद्यार्थ्यांना बोलावले होते हे सत्य आहे, या लोकानी जो आवाहाल दिला आहे त्याच्या विरुद्ध शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाली असून या प्रकरणी शाळेस वाचवण्याचा व विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळून आपले संबंध जपणार्या या तपास अधिकार्याचीच चौकशी करावी असी चर्चा शहरात चालू आहे