उदगीर येथील बॉण्ड विक्रेत्यांनी सरळ दीडी भावाने बॉन्ड बिक्री करत असताना, जनतेची दिवसा लूट होत असतानाही प्रशासन गप्प का आहे हे समजत नाही
उदगीर शहराच्या बॉन्ड विक्रेत्याने सामान्य माणसांची दिवसा लूट चालू केली आहे, शेतकरी व इतराना अनेक कामासाठी बॉन्ड घेणे जरुरी असताना येथील बॉण्ड विक्रेते हे 100 रुपये चा बॉण्ड 140,150 रुपयाला ते ही दहा गोष्टी बोलून देत आहेत, काही विक्रेते हे कोषागार कार्यालया बाहेर तर काही विक्रेते हे बैनामा कार्यालय परिसरात असून यांच्या वर प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने हे विक्रेते सामान्य माणसाची अडवणूक करून त्याची दिवसा लूट करत आहेत तरी प्रशासन गप्प का आहे हे समजत नाही, या लूट करणार्या बॉण्ड विक्रेत्यावर प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन कार्यवाही करावी व जनतेची लूट थांबवावी असी मागणी अनेक जन करत आहेत