उदगीर :- लातूर येथील प्रतिष्ठित व्यापारी रामेश्वरजी भराडीया चे सूपुत्र कृष्णा यांची राज्यसेवा मार्फत सहायक गट विकास अधिकारी पदी नियुक्ति झाली आहे
कृष्णा रामेश्वरजी भराडीया ने 2018 मध्ये झालेल्या राज्य सेवा परीक्षेत 125 वा नंबर घेतला असून त्यास 529 गुण मिळाले आहेत , शुक्रवारी आलेल्या निकालात त्याची सहायक गट विकास अधिकारी पदी निवड झाली आहे , त्याच्या कुटुंबात कोणी ही अधिकारी नाही, सर्व व्यापारात असतानाही त्याने हे यश प्राप्त केले आहे, लहानपणापासून हुशार असलेल्या कृष्णा चे प्राथमिक शिक्षण पुरणमल लाहोटी स्कूल लातूर, तर माध्यमिक शिक्षण वेंकटेश माध्यमिक विद्यालय लातूर येथे झाले , शाहू महाविद्यालयातून विज्ञान विभागातून शिक्षण घेऊन तो कॉलेज ऑफ पूना येथुन सिविल (सापत्य) अभियंत्याची पदवी प्राप्त केली पण त्याची अधिकारी बनण्याची इछ्या असल्याने त्याने राज्य सेवा व लोकसेवे ची तयारी सुरू केली त्याने दुसर्याच प्रयत्नात राज्य सेवेचे यश प्राप्त केले आहे , त्यास आय. ए. एस. बनायचे असून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोग चीही परीक्षा दिली असून त्याचा निकाल येणे बाकी आहे, त्याच्या या निवडी वर लातूर जिल्हा माहेश्वरी सभे चे अध्यक्ष राजकुमार पलोड, सचिव फूलचंद काबरा, ओमप्रकाश सारडा, ओमप्रकाश बजाज, उदगीर तालुका माहेश्वरी सभेचे मार्गदर्शक डॉ रामप्रसाद लखोटीया, ईश्वरप्रसाद बाहेती, अध्यक्ष विनोदकुमार टवानी, सचिव श्रीनिवास सोनी यांनी त्याचे व त्याच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी ही त्यास शुभेच्छा दिल्या आहेत